JSW Energy Q1 Results: पॉवर क्षेत्रातील दिग्गज जेएसडब्ल्यूनं (JSW) आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे म्हणजेच एप्रिल-जूनचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 48.3 टक्के घट झाली आणि कंपनीचा नफा 560 कोटींवरून 290 कोटी रुपयांवर आला. तर दुसरीकडे महसुलात 3.3 टक्के घट नोंदवली गेली. कंपनीचा महसूल 3026 कोटींवरून 2927 कोटींवर आला.
एप्रिल-जून तिमाहीत, कंपनीचा ((JSW Energy Shares) EBITDA म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन आणि ऑटोमायझेशन 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 1221 कोटी रुपये झाली. मार्जिनमध्येही लक्षणीय वाढ झाली. यात वार्षिक आधारावर 33.8 टक्क्यांवरून 41.7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 2927.85 कोटींवर
बीएसईवर उपलब्ध माहितीनुसार, जेएसडब्ल्यू एनर्जीचा पहिल्या तिमाहीत रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 2927.85 कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत तो 2,669.97 कोटी रुपये आणि एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 3,026.27 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 290.35 कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत तो 282.03 कोटी रुपये आणि एका वर्षापूर्वी तो 554.78 कोटी रुपये होता. रेव्हेन्यू सेगमेंटबद्दल बोलायचं झाल्यास, थर्मल विभागाचा महसूल 2,083.18 कोटी रुपये होता आणि रिन्यूएबल एनर्जीचा विभागाचा महसूल 780 कोटी रुपये होता.