Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजवरचे विक्रम मोडले, झाली छप्परफाड कमाई!

आजवरचे विक्रम मोडले, झाली छप्परफाड कमाई!

सरत्या वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १३२ लाख कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:56 PM2024-03-30T12:56:54+5:302024-03-30T12:57:14+5:30

सरत्या वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १३२ लाख कोटींची भर

The record was broken, and the income was huge! | आजवरचे विक्रम मोडले, झाली छप्परफाड कमाई!

आजवरचे विक्रम मोडले, झाली छप्परफाड कमाई!

नवी दिल्ली : ३१ मार्च रोजी संपत असलेले आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी जोरदार परतावा देणारे आणि उत्साह वाढवणारे ठरले आहे. या संपूर्ण वर्षभरात गुंतवणूकदारांची एकूण संपत्तीत १३२ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. आजवरच्या इतिहासात एका वर्षात झालेली ही सर्वाधिक वाढ ठरली आहे.

वर्षाच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स ६५५ अंकांनी वाढून ७३,६५१ वर बंद झाला. गुड फ्रायडेमुळे शुक्रवारी बाजार बंद होता. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात शेअर बाजाराचे एकूण भांडवली मूल्य २६२ लाख कोटी रुपयांवरून वाढून ३९४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हीच रक्कम डॉलर्समध्ये मोजल्यास ४.७ ट्रिलियन इतकी होते.

चीनच्या संकटामुळे भारताला संधी
आर्थिक संकटात सापडलेल्या चीनमुळे भारतील बाजाराला एक प्रकारचे वरदान मिळाले आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात २.१ लाख कोटी रुपये गुंतविले आहेत.

मोठ्या कंपन्या ठरल्या सरस
■ अनेक जुन्या कंपन्यांनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. जुन्या कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणूक- दारांनी सॉफ्टवेअर कंपन्या, खासगी बँका, एफएमसीजी शेअर्समध्ये तितकासा रस दाखवल्याचे दिसले नाही.
■ टाटा तसेच सरकारी कंपनी एनटीपीसीचे समभागही तितक्याच प्रमाणात वाढले. त्यावेळी एचयूएल, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्सनी मोठ्या प्रमाणात निराशा केल्याचे दिसले.

Web Title: The record was broken, and the income was huge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.