Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:07 AM2023-12-01T09:07:57+5:302023-12-01T09:09:41+5:30

China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते.

The result of the business comes after eating, I spent almost 40 thousand dollars for dinner with Xi Jinping. | जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

जेवल्यावर लागताे उद्याेगाचा निकाल, जिनपिंग यांच्यासाेबत भाेजनासाठी माेजा तब्बल ४० हजार डाॅलर

वाॅशिंग्टन - चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. अशा वेळी चीनमध्ये व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न निर्माण हाेताे. त्यावर उत्तर आहे ४० हजार डाॅलर खर्च करून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाेबत भाेजन करा आणि तुमचा प्रश्न मार्गी लावा. अमेरिकेतील वाॅल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालातून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

चीनने अनेक अमेरिकन कंपन्यांना आपल्या देशात प्रकल्प आणि व्यवसाय सुरू करण्यास सहमती दिली. मात्र, प्रत्यक्ष मंजुरीसाठी प्रचंड टाळाटाळ केली. ब्राॅडकाॅमने चीनमध्ये ‘व्हीएमवेअर’ या साॅफ्टवेअर कंपनीच्या खरेदीसाठी साैदा निश्चित केला हाेता. मात्र, ताे मंजुरीच्या अभावी बारगळला. नुकतेच जिनपिंग हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले हाेते. त्यावेळी ब्राॅडकाॅमचे सीईओ हाॅक टॅन हे जिनपिंग यांच्यासाेबत आयाेजित केलेल्या भाेजन समारंभात सहभागी झाले हाेते. यासाठी त्यांनी ४० हजार डाॅलर माेजले. (वृत्तसंस्था)

भाेजनानंतर काेणते निर्णय घेण्यात आले?
- ब्राॅडकाॅमच्या ६९ अब्ज डाॅलरच्या व्यवहाराला लगेच मंजुरी देण्यात आली.
- मास्टरकार्डलादेखील चीनमध्ये ‘युआन’मध्ये व्यवहार करण्यासाठी कार्डाला परवानगी मिळाली.

अनेक कंपन्यांचे प्रमुख झाले सहभागी
जिनपिंग यांच्यासाेबत आयाेजित भाेजन समारंभात ब्राॅडकाॅम, मास्टरकार्ड, बाेइंगसह अनेक कंपन्यांचे प्रमुख सहभागी झाले हाेते. प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याकडे दाेन्ही देशांतील संबंध सुधारण्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

Web Title: The result of the business comes after eating, I spent almost 40 thousand dollars for dinner with Xi Jinping.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.