नवी दिल्ली : जगातील १० टक्के अब्जाधीश भारतात आहेत. यावर्षी ते आणखी मालामाल झाले आहेत. फाेर्ब्सच्या यादीत असलेल्या भारतातील १०० अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढून ८०० अब्ज डाॅलर्स एवढी झाली आहे. उद्याेगपती गाैतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डाॅलर्स म्हणजे सुमारे १२ लाख ११ हजार काेटी रुपये एवढी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. त्यांच्याकडे ७.१० लाख काेटी रुपये एवढी संपत्ती आहे. सावित्री जिंदल या देशातील सर्वांत श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे १६ अब्ज डाॅलर्स म्हणजे सुमारे १.३२ लाख काेटी एवढी संपत्ती आहे. या यादीत हिंदुजा बंधू आणि बजाज कुटुंबीय सामील झाले आहेत.
गाैतम अदानी - १२.११ लाख कोटी
मुकेश अंबानी - ७.१० लाख कोटी
राधाकिशन दमानी - २. २२ लाख कोटी
सायरस पुनावाला - १. ७३ लाख कोटी
शिव नाडर - १.७२ लाख कोटी
सावित्री जिंदल - १.३२ लाख कोटी
दिलीप संघवी - १.२५ लाख कोटी
हिंदुजा ब्रदर्स - १.२२ लाख कोटी
कुमार बिर्ला - १.२१ लाख कोटी
बजाज कुटुंब - १.१७ लाख कोटी