चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Rinfra) चा निव्वळ तोटा वाढून 294.06 कोटी रुपये झाला आहे. कंपनीनं बुधवारी ही माहिती दिली. प्रामुख्याने खर्च वाढल्यानं कंपनीचा तोटाही वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 162.15 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. यानंतरही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्समध्ये कामकाजादरम्यान गुरुवारी थोडी वाढ झाली होती. परंतु नंतर कंपनीचा शेअर घसरून 179 रुपयांवर व्यवहार करत होता. शेअर्सच्या या वाढीमागे मोठे कारण आहे.आरइन्फ्रानं शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत सांगितलं की, या तिमाहीत त्यांचं एकूण उत्पन्न वाढून 7,373.49 कोटी रुपये झाले, जे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 6,411.42 कोटी रुपये होते. तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 7,100.66 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6,395.09 कोटी रुपये होता.शेअर्सची स्थितीगेल्या पाच दिवसांत रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 184.25 रुपयांनी वधारले आहेत. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 22 टक्क्यांनी वाढलाय. स्टॉक या वर्षी YTD 33.66 टक्के आणि गेल्या एका वर्षात 25.64 टक्के वाढला. गेल्या पाच वर्षात हा शेअर 49 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 2008 मध्ये हा शेअर 2400 रुपयांवर पोहोचला होता आणि सध्या त्याची किंमत 180 रुपयांच्या जवळपास आहे.
₹२४०० वरुन ₹१८४ वर आला हा शेअर, कंपनीचा तोटा वाढला; तरी गुंतवणूकदारांकडून खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 2:59 PM