Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला

सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला

सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले.

By मनीषा म्हात्रे | Published: September 30, 2024 10:08 AM2024-09-30T10:08:10+5:302024-09-30T10:09:58+5:30

सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले.

The 'share market' fell in love with profit fake commitments, fraud | सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला

सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला

- मनीषा म्हात्रे
वरिष्ठ प्रतिनिधी

गुंतवणुकीसाठी शेअर ट्रेडिंगकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढला. याच चढाओढीत सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. दिवसाआड शेअर, क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट होत असताना सायबर भामट्यांनी डेटिंग ॲपववरूनही शेअर ट्रेडिंगचे जाळे पसरविल्याने चिंतेत भर पडली आहे. डेटिंग ॲपवरून ओळख करायची. सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले.

यापूर्वी डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत खंडणी उकळण्याचा घटना समोर येत होत्या. त्यात शेअर ट्रेडिंगची वाढती क्रेझ पाहून डेटिंग ॲपद्वारेही जाळे पसरविण्यास  सुरुवात केली आहे. भायखळा परिसरात मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने टिंडर ॲप डाउनलोड केले. सुरुवातीला कार्मेन अनिता नावाच्या महिलेशी ओळख झाली. व्हॉट्सॲपद्वारे संवाद सुरू झाला. मधाळ संवादानंतर त्यांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. पुढे एक वेबसाइट पाठवून त्यावर  ट्रेडिंग करण्यास सांगितले. महिलेच्या सांगण्याप्रमाणे ट्रेडिंग केले. सुरुवातीला १७ लाखांची  गुंतवणूक केली. ट्रेडिंग खात्यावरही १७ लाख जमा झालेले दिसले. महिलेवर विश्वास बसला. त्यानंतर  महिलेच्या सांगण्यानुसार ते खात्यात पैसे जमा करत गेले. पुढे, दुसऱ्या डेटिंग ॲपद्वारे शरिका सिंग नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. तिनेही अशाच प्रकारे गुंतवणूक करण्यास सांगितले. दोघींच्या जाळ्यात अडकून २ कोटी १४ गुंतवले. नफा काढण्याची वेळ आली, तेव्हा आणखीन पैशांची मागणी केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
अशाच प्रकारच्या घटना डोकेवर काढत आहे. जानेवारी ते मेदरम्यान गुंतवणूक सायबर फसवणुकीच्या ३५५ घटनांची मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाली. त्यापैकी अवघ्या ७६ गुन्ह्यांची उकल करत ९१ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. धक्कादायक म्हणजे उच्चशिक्षित, व्यावसायिक मंडळीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत पावले उचलणे गरजेचे आहे. 
फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांच्या १९३० वर संपर्क साधून तक्रार करा. आजवर सायबर हेल्पलाइनमुळे कोट्यवधी रुपये खात्यात परत येण्यास मदत झाली आहे.

दुसरीकडे शेअर ट्रेडिंग फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या एकाच बँक खात्याचा एकाच वेळी देशभरातून ४० ते ५० सायबर गुन्ह्यांसाठी वापर होत असल्याचेही पोलीस कारवाईतून समोर येत आहे. गरीब, गरजूंना हाताशी धरून त्यांच्या बँक खात्यात रक्कम वळती करायची. 

सायबर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत आरोपीचा बँक खात्याचा अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाल्याचे  स्पष्ट झाले आहे. एनसीसीआर पोर्टलवर या बँक खात्यासंदर्भात देशभरातून ४१ तक्रारीची नोंद झाली आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात ४५ तक्रारींचा समावेश होता. आतापर्यंत पोलीस आरोपी बँक खातेधारकापर्यंत पोहचताना दिसत आहे. मात्र, यामागील मास्टरमाइंडचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

Web Title: The 'share market' fell in love with profit fake commitments, fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.