Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' दिग्गज कंपनीचा शेअर १० भागांत विभागला जाणार; Q2 मध्ये ₹९०८ कोटींचा नफा, गुंतवणूकदार खूश

'या' दिग्गज कंपनीचा शेअर १० भागांत विभागला जाणार; Q2 मध्ये ₹९०८ कोटींचा नफा, गुंतवणूकदार खूश

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 908 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:42 PM2023-10-19T15:42:44+5:302023-10-19T15:42:56+5:30

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 908 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

The share of Nestle India giant company will be divided into 10 parts Q2 profit at rs 908 crore investors happy | 'या' दिग्गज कंपनीचा शेअर १० भागांत विभागला जाणार; Q2 मध्ये ₹९०८ कोटींचा नफा, गुंतवणूकदार खूश

'या' दिग्गज कंपनीचा शेअर १० भागांत विभागला जाणार; Q2 मध्ये ₹९०८ कोटींचा नफा, गुंतवणूकदार खूश

Nestle India Q2 Results 2023: एफएमजीसी (FMCG) क्षेत्रातील दिग्गज कंपनी नेस्ले इंडियाचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 908 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 661.46 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर नेस्ले इंडियाच्या निव्वळ नफ्यात 37.27 टक्के वाढ झाली आहे. गुरुवारी नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये कामकाजाच्या अखेरस 3.51 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचे शेअर्स 24,080 रुपयांवर पोहोचले.

10 भागांत विभागला जाणार
शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत नेस्ले इंडियाने म्हटलं की, शेअर्स 10 भागात विभागले जातील. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 1 रुपये होईल. तथापि, कंपनीने अद्याप स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. नेस्ले इंडियाने तिमाही निकालांसोबत 1400 टक्के लाभांश देण्याचा निर्णयही घेतला आहे.

किती होता महसूल?
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 5036.80 कोटी रुपये होता. तर वर्षभरापूर्वी तो 4601.80 कोटी रुपये होता. म्हणजेच नेस्ले इंडियाचा महसूल वार्षिक आधारावर 9.5 टक्क्यांनी वाढला आहे. “देशांतर्गत विक्रीनं दुहेरी आकडा ओलांडला आहे. कंपनीची उलाढाल 5000 कोटींहून अधिक आहे. जे कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीचे संचालक सुरेश नारायणन म्हणाले.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: The share of Nestle India giant company will be divided into 10 parts Q2 profit at rs 908 crore investors happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.