Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹348 वरून आपटत ₹8 वर आला या उर्जा कंपनीचा शेअर, आता मिळाला मोठा कॉन्ट्रॅक्ट

₹348 वरून आपटत ₹8 वर आला या उर्जा कंपनीचा शेअर, आता मिळाला मोठा कॉन्ट्रॅक्ट

सुझलॉन विंड टर्बाइनचा पुरवठा करेल. याशिवाय, प्रकल्प पूर्णकरून तो सुरूही करेल. याच बरोबर, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे संचालन आणि देखभालही करेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:17 PM2023-04-12T21:17:08+5:302023-04-12T21:21:23+5:30

सुझलॉन विंड टर्बाइनचा पुरवठा करेल. याशिवाय, प्रकल्प पूर्णकरून तो सुरूही करेल. याच बरोबर, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे संचालन आणि देखभालही करेल.

The share of suzlon energy company fell to ₹8 from ₹348, now got a big contract from sembcorp share surges | ₹348 वरून आपटत ₹8 वर आला या उर्जा कंपनीचा शेअर, आता मिळाला मोठा कॉन्ट्रॅक्ट

₹348 वरून आपटत ₹8 वर आला या उर्जा कंपनीचा शेअर, आता मिळाला मोठा कॉन्ट्रॅक्ट

सुझलॉन समूहाला सेम्बकॉर्पची उपकंपनी असलेल्या ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी लिमिटेडसाठी 50.4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा  प्रकल्प विकसित करण्याचा ठेका मिळाला आहे. या संदर्भात बातमी आल्यानंतर कंपनीचा शेअर इंट्राडे ट्रेडमध्ये 1% ने वधारला होता. कंपनीची शेअर प्राइस 8.11 रुपयांवर बंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, 2007 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 348 रुपये एवढी होती.

यासंदर्भात सुझलॉन समूहाने बुधवारी एक निवेदन जारी केले आहे, यात 'ऑर्डरचा एक भाग म्हणून सुझलॉन एक हायब्रिड लॅटिस ट्यूबलर (एचएलटी) टॉवरसह 24 पवन टर्बाइन जनरेटर (डब्ल्यूटीजी) लावेल. याची क्षमता प्रत्येकी 2.1 मेगावॅट एवढी असेल. तसेच कर्नाटकातील हा प्रकल्प 2024 मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे.

सुझलॉन विंड टर्बाइनचा पुरवठा करेल. याशिवाय, प्रकल्प पूर्णकरून तो सुरूही करेल. याच बरोबर, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे संचालन आणि देखभालही करेल. ही ऑर्डर म्हणजे, सेम्बकॉर्पद्वारे रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडकडून जिंकलेल्या बोलीचाच भाग आहे, असेही संबंधित निवेदनात म्हणण्यात आले आहे.  
 
यासंदर्भात बोलताना सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेपी चालसानी म्हणाले, “पवन ऊर्जा क्षेत्रातील 28 वर्षांचा अनुभव असलेली आमची कंपनी भारताच्या हवामानाविरुद्धच्या लढ्यातही योगदान देण्यास सक्षम आहे.” तसेच सेम्बकॉर्प इंडिया ही कंपनी एकूण 18 राज्यांमध्ये कार्यरत आहे.

Web Title: The share of suzlon energy company fell to ₹8 from ₹348, now got a big contract from sembcorp share surges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.