Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण! निफ्टी २१,५०० च्या खाली, सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरला

शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण! निफ्टी २१,५०० च्या खाली, सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरला

गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:31 PM2024-01-18T17:31:15+5:302024-01-18T17:32:42+5:30

गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे.

The stock market fell on the third day Sensex fell by 830 points and Nifty by 290 points | शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण! निफ्टी २१,५०० च्या खाली, सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरला

शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण! निफ्टी २१,५०० च्या खाली, सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरला

गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. आता आज गुरुवारी सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. बुधवारप्रमाणे गुरुवारीही बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३१४ अंकांनी तर निफ्टी २१,५०० अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या समभागातील नफा बुकिंगमुळे बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली.

आज बाजारात सकाळच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण झाली, त्यानंतर मिड कॅप निर्देशांक १३०० अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक ४०० हून अधिक अंकांनी घसरला. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या बाजाराने खालच्या स्तरावरून उत्कृष्ट रिकव्हरी दाखवली. आजच्या व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स ३१४ अंकांच्या घसरणीसह ७१,१८७ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११० अंकांच्या घसरणीसह २१,४६२ अंकांवर बंद झाला.

एकाच दिवसात ₹1187 ने वाधारला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; एका बातमीचा परिणाम!

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, इन्फ्रा हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग तेजीने बंद झाले. तर बँकिंग, आयटी, वित्तीय सेवा, एफएमसीजी, धातू, मीडिया, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. सकाळी मोठी घसरण झाल्यानंतर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक फ्लॅट क्लोजमध्ये बंद झाले. सेन्सेक्समधील३० समभागांपैकी १२ समभाग वाढीसह आणि १८ घसरणीतसह बंद झाले. तर ५० निफ्टी समभागांपैकी २२ वाढीसह आणि २८ घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये फारशी घसरण झालेली नाही. आज बाजार बंद असताना, बीएसईवर लिस्टेड समभागांचे मार्केट कॅप ६७,००० कोटी रुपयांनी घसरले आणि ३६९.७५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले.

Web Title: The stock market fell on the third day Sensex fell by 830 points and Nifty by 290 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.