Join us

शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 5:52 AM

विक्रीचा माऱ्यातून आलेल्या दबावामुळे मंगळवारी सेन्सेक्स घसरला. यामुळे बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात मोठी घसरण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विक्रीचा माऱ्यातून आलेल्या दबावामुळे मंगळवारी सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरला. यामुळे बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात मोठी घसरण झाली. बाजारातील गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रुपये बुडाले. सलग दुसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र सुरू राहिले. सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरून ८०,२२० अंकांवर स्थिरावला तर निफ्टी ३०९ अंकांनी घसरून २४,४७२ अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २७ मध्ये घसरण तर ३ वधारले. रिलायन्स, एचडीएफसी बँक, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आदी शेअर्स वधारले. स्मॉलकॅप निर्देशांक ३.८१ टक्के तर मिडकॅप निर्देशांक २.५२ टक्के घसरला.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक