रिलायन्स जिओ (Reliance Jio) सातत्यानं ओटीटी प्लॅन लाँच करत आहे. आता रिलायन्स जिओनं ओटीटी बेनिफिट्ससह नवीन अॅन्युअल प्लान्स लॉन्च केला आहे. तुम्हीही जिओ युझर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओकडे ओटीटी बेनिफिट्ससह अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना Netflix, Disney Plus Hotstar, SonyLIV Plan, ZEE5 Plan आणि ZEE5-SoniLIV कॉम्बो यासारखे ओटीटी सबस्क्रिप्शन मिळतात आणि आता Jio नं नवीन अॅन्युअल प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन प्राइम व्हिडीओ मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनच्या किंमती आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊ.दिवसाचा खर्च जवळपास ८ रुपयेजिओच्या या नवीन प्लॅनची किंमत 3,227 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे आणि यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. तुम्ही दैनंदिन डेटा मर्यादा संपवली तरीही तुम्ही 64 Kbps वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकता. याशिवाय, नवीन प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील समाविष्ट आहेत.ओटीटी बेनिफिट्सबद्दल बोलायचं झाल्यास, जिओच्या 3,227 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये Jio TV, JioCinema आणि JioCloud चं देखील सबस्क्रिप्शन मिळतं समाविष्ट आहे. इतकंच नाही तर, या प्लॅनचे ग्राहक अमर्यादित ट्रू 5G डेटाचाही वापर करू शकतात.जिओ भारत सीरिज फोनजिओनं आपल्या जिओ भारत सीरीज अंतर्गत JioBharat B1 नावाचा एक नवीन 4G फोन लॉन्च केला आहे. नवीन फोन बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या JioBharat V2 आणि K1 कार्बन मॉडेलचं अॅडव्हान्स्ड व्हर्जन आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर JioBharat B1 सीरिज म्हणून लिस्ट करण्यात आला आहे. JioBharat B1 सीरिजची किंमत 1299 रुपये आहे. हा Jio चा एक स्वस्त 4G फोन आहे, ज्यात 2.4 इंच स्क्रीन आणि 2000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
३६५ दिवसांच्या रिचार्जचं टेन्शन संपलं, मोफत पाहा Prime Video; डेली २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 5:45 PM