Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती

₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती

शेअर मार्केटमध्ये असे काही पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. या स्टॉकनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:05 PM2024-02-21T12:05:48+5:302024-02-21T12:06:10+5:30

शेअर मार्केटमध्ये असे काही पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. या स्टॉकनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

The upper circuit continues Standard Capital Markets Share rs 3 52 week high all time February 13 meeting | ₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती

₹३ च्या शेअरमध्ये सतत लागतंय अपर सर्किट, १३ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर बदलली परिस्थिती

Standard Capital Markets Share: शेअर मार्केटमध्ये असे काही पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. असाच एक पेनी स्टॉक स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचा आहे. हा पेनी स्टॉक्स शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय नॉन-बँकिंग कंपनी (NBFC) स्टॉक्सपैकी एक आहेत. या पेनी स्टॉकची किंमत 5 रुपयांपेक्षा कमी आहे, परंतु या शेअरला सातत्यानं अपर सर्किट लागत आहे.
 

शेअरची स्थिती काय?
 

बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सच्या शेअरला अपर सर्किट लागलं आणि याची किंमत 3.12 रुपयांवर पोहोचली. यापूर्वी मंगळवारीही या शेअरला मोठी डिमांड होती. गेल्या महिन्यात अनेक दिवस या शेअरला अपर सर्किट लागलं होतं. या एनबीएफसी शेअरनं 16 जानेवारी 2024 रोजी 3.32 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. यापूर्वी 21 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 1.08 रुपयांपर्यंत घसरली होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
 

13 फेब्रुवारीला झालेली बैठक
 

कॅपिटल मार्केट्सच्या संचालक मंडळाची 13 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत स्टँडर्ड कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड या नावानं पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय मुख्य वित्त अधिकारी म्हणून आकाश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच कंपनीनं 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. याशिवाय 2:1 बोनस शेअर्ससाठी बीएसईची मंजुरीही घेण्यात आली होती.
 

शेअरहोल्डिंग पॅटर्न डिटेल
 

कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाल्यास, 17.81 टक्के हिस्सा प्रवर्तकाकडे आहे तर पब्लिक शेअर होल्डरकडे 82.19 टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या 28 वैयक्तिक प्रवर्तकांकडे कंपनीचे 7,19,98,930 शेअर्स आहेत. प्रमुख भागधारकांमध्ये राम गोपाल जिंदल आणि गौरव जिंदल यांचा समावेश आहे. 
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: The upper circuit continues Standard Capital Markets Share rs 3 52 week high all time February 13 meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.