नवी दिल्ली : भारत व आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. अदानी हे जगातील श्रीमंतांच्या टॉप-२० यादीतून बाहेर फेकले जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. ‘१०० अब्ज डॉलर क्लब’मधून ते आधीच बाहेर फेकले गेले आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स’नुसार, अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी ६७.३ कोटी डॉलरची घसरण झाली. ९८.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते श्रीमंतांच्या यादीत १८ व्या स्थानी आहेत.
मुकेश अंबानी १४ व्या स्थानी- देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती सोमवारी ९८.४ लाख डॉलरने घटली आहे. - १०४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते यादीत १४ व्या स्थानी आहेत. त्यांच्या संपत्तीत ७.९१ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. रिलायन्सने सोमवारी तिमाहीच्या कामगिरीची घोषणा केली. कंपनीच्या नफ्यात ३ टक्के घसरण झाली आहे.
जगातील टॉप-५ श्रीमंत आणि त्यांची संपत्ती (आकडेवारी अब्ज डाॅलरमध्ये )२४१ इलॉन मस्क टेस्ला
२१० जेफ बेझोस ॲमेझॉन
२०९ मार्क झुकरबर्ग मेटा
१८६ लॅरी एलिसन एलिसन
१८५ बर्नार्ड अरनॉल्ट एलव्हीएमएच