Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार

वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार

एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या युजरमागील महसूल वाढविण्यासाठी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे या कंपन्यांचे कंबरडे मोडणाऱ्या जिओने फाईव्ह जीच्या ग्राहकांसाठी कोणत्याही वाढीवर नकार दर्शविला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:39 AM2023-10-30T11:39:09+5:302023-10-30T11:39:43+5:30

एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या युजरमागील महसूल वाढविण्यासाठी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे या कंपन्यांचे कंबरडे मोडणाऱ्या जिओने फाईव्ह जीच्या ग्राहकांसाठी कोणत्याही वाढीवर नकार दर्शविला आहे.

The year has come to an end! Can Airtel, Jio, Vodafone companies hike terriff plans 5G, 4G money? Whats there plan | वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार

वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार

टेलिकॉम कंपन्यांनी गेले वर्षभर फोरजीच्या पैशांतच फाईव्ह जीचा स्पीड दिला आहे. परंतू, फाईव्ह जीच्या खर्चामुळे आणि वाढलेल्या खर्चामुळे या कंपन्यांना परवडेनासे झाले आहे. त्यांच्या महसुलावर फरक पडू लागला आहे. व्होडाफोन-आयडियाची तर बातच वेगळी आहे. यामुळे या कंपन्या रिचार्ज प्लॅन महाग करण्याच्या तयारीत आहेत.

एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या युजरमागील महसूल वाढविण्यासाठी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे या कंपन्यांचे कंबरडे मोडणाऱ्या जिओने फाईव्ह जीच्या ग्राहकांसाठी कोणत्याही वाढीवर नकार दर्शविला आहे. जिओची नजर एअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएलच्या त्या २४ कोटी ग्राहकांवर आहे, जे आजही टुजी नेटवर्क वापरत आहेत. 

अशावेळी जर जिओने दर वाढविले तर त्याचा परिणाम या ग्राहकांच्या स्विच होण्यावर होणार आहे. यामुळे जिओने टेरिफ वाढविण्यावर आकडते घेतले आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन यांनी सांगितले की, कंपनीची टॅरिफमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची योजना नाहीय. देशाला 2G मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वस्त दरात सेवा देणे आहे.

Jio चा ARPU दुसऱ्या तिमाहीत रु. 181.7 वर पोहोचला, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु. 177.2 होता आणि मागील तिमाहीत रु. 180.5 होता. दुसरीकडे व्होडाफोन आणि एअरटेलने दर वाढविण्याचे समर्थन केले आहे. भारती एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल म्हणाले, 'आम्हाला उद्योगासाठी अधिक आर्थिक पाठबळ हवे आहे कारण त्यात भरपूर भांडवल खर्च होत आहे. त्यामुळे ARPU मध्ये वाढ आवश्यक आहे. एआरपीयू 300 रुपयांपर्यंत असावा. 

कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाचा एआरपीयू दुसऱ्या तिमाहीत केवळ 142 रुपये होता. यावरून व्होडाफोन आयडियाला या शर्यतीत स्वतःला कायम ठेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. एआरपीयू म्हणजे एका ग्राहकामागे रिचार्जमधून कंपनीला मिळणारा महसूल आहे. म्हणजेच एअरटेल त्यांचा रिचार्ज दर २५० ते ३०० रुपये करण्याच्या तयारीत आहे. 

Web Title: The year has come to an end! Can Airtel, Jio, Vodafone companies hike terriff plans 5G, 4G money? Whats there plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.