Join us  

वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:08 AM

दोन बहिणींनी मिळून एका छोट्याशा खोलीत त्यांचा बेकरीचा व्यवसाय सुरू केला, जो आज एक मोठा व्यवसाय झाला आहे. देशभरात त्यांचे अनेक आउटलेट्स आहेत.

दोन बहिणींनी मिळून एका छोट्याशा खोलीत त्यांचा बेकरीचा व्यवसाय सुरू केला, जो आज एक मोठा व्यवसाय झाला आहे. देशभरात त्यांचे अनेक आउटलेट्स आहेत. आता या कंपनीशी हजारो कर्मचारी जोडले गेले आहेत. 'थिओब्रोमा' ही कंपनी भारतातील लोकप्रिय बेकरी ब्रँडपैकी एक आहे. केनाज आणि टीना मेसमान नावाच्या बहिणींनी २००४ मध्ये याची सुरुवात केली होती.

मुंबईत राहणाऱ्या दोन बहिणींनी २००४ मध्ये वडिलांकडून काही पैसे उधार घेऊन एका छोट्याशा खोलीत बेकरीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय इतका वेगाने वाढला की आज तो भारतातील सर्वात मोठ्या बेकरी ब्रँडपैकी एक बनला आहे. त्यांची २२५ आउटलेट्स देशभरात उघडली गेली आहेत आणि कंपनीचं व्हॅल्यूएशन हे ३५०० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. केनाज आणि टीना यांनी कोणत्याही मोठ्या व्यावसायिक प्लॅन केवळ त्यांच्या पॅशनच्या जोरावर इतका मोठा व्यवसाय उभा केला.

२००४ मध्ये थिओब्रोमाचा प्रवास सुरू झाला जेव्हा केनाझला पाठीच्या दुखापतीमुळे नोकरी सोडावी लागली. ती पेस्ट्री सेफ म्हणून काम करत असे. ती आईला विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात मदत करायची. वयाच्या १६ व्या वर्षी जेव्हा ती फ्रान्सच्या दौऱ्यावर गेली तेव्हा तिने ठरवलं की, तिला भविष्यात शेफ बनायचे आहे. भारतातील अग्रगण्य हॉटेल व्यवस्थापन संस्था IHM मुंबई आणि ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट (OCLD) दिल्ली येथून पदवीधर असलेल्या केनाज यांनी २००४ मध्ये पहिले थियोब्रोमा पेस्ट्री शॉप सुरू करण्यापूर्वी ओबेरॉय उदयविलास येथे पेस्ट्री शेफ म्हणून काम केलं.

बहिणींकडे बेकिंगचा चांगला अनुभव होता, पण बेकरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना भांडवलाची गरज होती. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना मदत केली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी सुरुवातीचे दीड कोटी रुपयांचं भांडवल गुंतवलं. त्यांची सुरुवात अगदी शुन्यापासून झाली नव्हती, कारण त्या आधीच घरी बेकिंग करत होत्या. हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना या भांडवलाची गरज होती.

कंपनीच्या नावामागील कथाही खूप रंजक आहे. बहिणींचं पहिलं आउटलेट २००४ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील कुलाबा येथे उघडण्यात आलं. बेकरीसाठी नाव निवडणं देखील मनोरंजक होतं. अशा परिस्थितीत एका मित्राने त्याचं नाव Theobroma ठेवलं, जो ग्रीक शब्द theos (God) आणि broma (food) पासून आला आहे. सर्वांना हे नाव खूप आवडलं आणि या कंपनीचं नाव थिओब्रोमा ठेवण्यात आलं. 

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी