Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

Petrol, Diesel Price Today: गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:17 AM2022-09-18T10:17:33+5:302022-09-18T10:31:03+5:30

Petrol, Diesel Price Today: गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे

There are indications that there will be a big relief, petrol will be cheaper by Rs 12 in the country | Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

नवी दिल्ली - गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल २५ ते ३० डॉलरनी स्वस्त झाले आहे. सध्या क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति-बॅरल दरावर ट्रेंड होत आहे. मात्र आपल्या देशात पेट्रोलडिझेलच्या किमतींमध्ये कुठलीही घट झालेली नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केलयानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे ९.५० आणि ७ रुपयांनी घट झाली होती. 

सध्या ब्रेंट क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेंड करत आहे. तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार क्रूड ऑईलच्या किमती ह्या ८०.८५ डॉलरपर्यंत घसरू शकतात. या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. 

माध्यमांतील वृत्तानुसार खनिज तेलाच्या किमतींमध्ये १ डॉलर प्रति बॅरलने वाढल्यास किंवा घटल्यास देशात तेल कंपन्यांना एक लिटरमागे ४५ पैशांचा परिणाम होतो. या हिशोबाने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११ ते १२ रुपयांची घट होऊ शकते. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल १११.३५ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलीटर दराने मिळते.  

Web Title: There are indications that there will be a big relief, petrol will be cheaper by Rs 12 in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.