Join us  

व्हिडीओ कॉलिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपपूर्वीच अनेक अ‍ॅप्स उपलब्ध

By admin | Published: November 17, 2016 3:54 AM

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी अखेर व्हॉट्सअ‍ॅपचे व्हिडीओ कॉलिंग हे नवीन फिचर सुरू झाले. व्हॉट्सअ‍ॅपने बिटा व्हर्जनसाठी व्हिडीओ

अनिल भापकर / औरंगाबादअनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी अखेर व्हॉट्सअ‍ॅपचे व्हिडीओ कॉलिंग हे नवीन फिचर सुरू झाले. व्हॉट्सअ‍ॅपने बिटा व्हर्जनसाठी व्हिडीओ कॉलिंगची सुविधा सुरू केली. मात्र व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यासाठी एकच अट सध्या आहे, ती म्हणजे तुम्ही ज्या व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला व्हिडीओ कॉल करत आहेत, त्यानेसुद्धा व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले असले पाहिजे, तरच तुम्ही व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप हे व्हिडीओ कॉलिंगची सेवा देणारे एकमेव अ‍ॅप नाही. याआधी स्नॅपचॅट, फेसबुक मेसेंजर, व्हायबर, हँगआउट, ड्युओ, फेसटाइम तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते स्काइप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगची सेवा आधीपासूनच देत आहे. सध्या असे अनेक अ‍ॅप उपलब्ध यापैकी काही महत्त्वाच्या व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपविषयी आपण जाणून घेऊ या.ड्युओ : यावर्षी मे महिन्यात गुगलने अ‍ॅलो आणि ड्युओ अशी दोन अ‍ॅप स्मार्टफोन युझर्ससाठी उपलब्ध करून दिली. यापैकी अ‍ॅलो हे मेसेंजर अ‍ॅप आहे, तर ड्युओ हे खास व्हिडीओ कॉलिंग साठीचे अ‍ॅप आहे. ड्युओ वापरायला अत्यंत सोपे आहे. यामध्ये लिमिट मोबाइल डेटा हे आॅप्शन आहे. म्हणजे तुमचा मोबाइल डेटा एका मर्यादेपर्यंतच खर्च करायचा हे तुम्ही ठरवू शकता. शिवाय नॉक नॉक हे फिचरसुद्धा यामध्ये आहे. तसेच नको असलेल्या लोकांना ब्लॉक करण्याची सुविधासुद्धा ड्युओमध्ये आहे. ड्युओचे अजून एक महत्त्वाचे फिचर म्हणजे कॉल चालू असताना तुम्ही वाय-फाय किंवा मोबाईल डेटा यामध्ये स्वीच करू शकता तेसुद्धा कॉल ड्रॉप न होता. एकूणच काय तर वापरायला सोपे आणि हवे तेवढेच फिचर घेऊन ड्युओ सेवा देत आहे.फेसटाईम : फेसटाईम हेसुद्धा व्हिडीओ कॉलिंग सेवा देणारे अजून एक चांगले अ‍ॅप आहे. यामध्ये सर्वात चांगले फिचर म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडीओ कॉल करता तेव्हा समोरच्याकडे फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन नसला, तरी चालतो तुम्ही त्यासोबत फक्त आॅडिओ कॉल करू शकता. फेसटाईमची आॅडिओ कॉलिटी फार चांगली आहे. फेसटाईमचे लिमिटेशन म्हणजे हे फक्त अँपल युझर्ससाठीच उपलब्ध आहे.स्काइप : व्हिडीओ कॉलिंगमध्ये सर्वात मोठा प्लेअर म्हणजे स्काइप. हे सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करते, जसे की, विंडोज, अँड्रॉइड, आयओएस, पीसी आदी. स्काइपमध्ये अनेक फिचर आहेत जसे की ग्रुप व्हिडीओ कॉल्स, फ्री व्हॉइस कॉल्स, ग्रुप चॅट, शेअर फोटो, व्हिडीओ, इमोजी आदी.हँगआउट : व्हिडीओ कॉलिंगमधील अजून एक मोठे नाव म्हणजे गुगलचे हँगआउट. यामध्ये व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंगसोबतच अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉलिंग, फोटो, व्हिडीओ, स्टिकर, ईमोजी पाठविणे आदी सुविधा यामध्ये आहेत.जस्टॉक : जस्टॉक हे एक अजून फक्त व्हििडओ कॉलिंगसाठी असलेले अ‍ॅप आहे. यामध्ये वन टू वन व्हिडीओ कॉलिंगसोबतच ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये व्हिडीओ कॉलिंग चालू असताना फोटो शेअर करता येतात. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधासुद्धा यामध्ये आहे. जस्टॉक हे अँड्रॉइड आणि आयफोन दोघांनाही सपोर्ट करते.