Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिन्याला २०,५०० रुपयांपर्यंत कमाई करण्याची आहे मोठी संधी; Post Office च्या स्कीमबद्दल जाणून घ्या

महिन्याला २०,५०० रुपयांपर्यंत कमाई करण्याची आहे मोठी संधी; Post Office च्या स्कीमबद्दल जाणून घ्या

Post Office Investment : पगारदार व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय निवृत्तीनंतरचं जीवन जगू शकतील. पण त्यासाठी योग्य गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 02:32 PM2024-08-21T14:32:12+5:302024-08-21T14:32:46+5:30

Post Office Investment : पगारदार व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय निवृत्तीनंतरचं जीवन जगू शकतील. पण त्यासाठी योग्य गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे.

There is a great opportunity to earn up to Rs 20500 per month Know about Post Office schemes senior citizen pension scheme | महिन्याला २०,५०० रुपयांपर्यंत कमाई करण्याची आहे मोठी संधी; Post Office च्या स्कीमबद्दल जाणून घ्या

महिन्याला २०,५०० रुपयांपर्यंत कमाई करण्याची आहे मोठी संधी; Post Office च्या स्कीमबद्दल जाणून घ्या

पगारदार व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय निवृत्तीनंतरचं जीवन जगू शकतील. पण त्यासाठी योग्य गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही निवृत्तीचा विचार करत असाल आणि पेन्शनच्या स्वरूपात चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला पाच वर्षांसाठी दरमहा सुमारे २०,००० रुपये मिळतील. ही योजना पोस्ट ऑफिसअंतर्गत येते. या योजनेवर केंद्र सरकारकडून ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर दिला जात आहे.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना

खरं तर आज आपण केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन स्कीमबद्दल बोलत आहोत. ही योजना इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज दर देते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत केवळ ६० वर्षांवरील व्यक्तीच गुंतवणूक करू शकतात. या योजनेवर सध्या ८.२ टक्के परतावा मिळतो.

दरमहा २०,५०० रुपये मिळतील

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी सुमारे २ लाख ४६ हजार रुपयांचे व्याज मिळेल. याला महिन्यानुसार पाहिलं तर ही रक्कम २० हजार ५०० रुपये आहे. या योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी तुमचे वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र, ५५ ते ६० वयोगटातील स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणारे लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

एससीएसएसमध्ये तुम्ही कमीत कमी १००० रुपये डिपॉझिट आणि १००० च्या पटीत रक्कम टाकून खातं उघडू शकता. आपण सर्व एससीएसएस खात्यांमध्ये जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर मिळणाऱ्या परताव्यावरही कर आकारला जातो. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज असेल तर त्यावर टीडीएस भरावा लागेल. मात्र, फॉर्म १५ जी/१५ एच भरल्यास व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही.

Web Title: There is a great opportunity to earn up to Rs 20500 per month Know about Post Office schemes senior citizen pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.