Lokmat Money > बिझनेस न्यूज > हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही

हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही

जर कोणीही या रक्कमांसाठी दावे करण्यास पुढे आले नाही तर १० वर्षांनी ही रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषासाठी दिली जाते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:13 AM2022-02-18T07:13:34+5:302022-02-18T07:14:09+5:30

जर कोणीही या रक्कमांसाठी दावे करण्यास पुढे आले नाही तर १० वर्षांनी ही रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषासाठी दिली जाते

There is no guardian for 21 thousand 539 crores from LIC Policy | हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही

हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीची तुम्ही, तुमच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची पॉलिसी घेतली असेल आणि तुमच्या ते अद्याप स्मृतीत राहिलेले नसेल तर लाखोची रक्कम तुमची वाट पाहात आहे. कारण आतापर्यंत कोणीही दावे केले नाहीत, अशी मिळून एकूण २१ हजार ५३९ कोटी रुपयांची रक्कम एलआयसीकडे पडून आहे.

कंपन्या करतात काय?
प्रत्येक विमा कंपनीला त्यांच्याकडील विना दाव्याची १ हजारावरील प्रत्येक रकमेची माहिती वेबसाइटवर द्यावी लागते. या राशीचे आपण लाभार्थी आहोत, हे तपासण्यासाठी वेबसाइटवर सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते.

ही रक्कम अखेर कोणाला मिळणार?
जर कोणीही या रक्कमांसाठी दावे करण्यास पुढे आले नाही तर १० वर्षांनी ही रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषासाठी दिली जाते

तुम्ही कसा करू शकाल दावा?
तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर घरी बसून तुम्ही आपल्या रकमेसंदर्भात माहिती घेऊ शकता. यासाठी licindia.in या वेबसाईटवरील सर्वात तळात असलेल्या Unclaimed-Policy-Dues या लिंकवर क्लिक करावे लागेल. तिथे एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आपल्याला पैसे मिळणार आहेत की नाही याची माहिती मिळू शकेल.

Web Title: There is no guardian for 21 thousand 539 crores from LIC Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.