Lokmat Money > बिझनेस न्यूज > Children’s Day 2023: मुलीच्या भविष्याचं टेन्शन नाही, काही वर्षांत जमेल ₹६७,३४,५३४ फंड; इतकी करावी लागेल गुंतवणूक

Children’s Day 2023: मुलीच्या भविष्याचं टेन्शन नाही, काही वर्षांत जमेल ₹६७,३४,५३४ फंड; इतकी करावी लागेल गुंतवणूक

या योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी ₹67,34,534 पर्यंत निधी सहज जोडू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 01:52 PM2023-11-14T13:52:57+5:302023-11-14T13:54:22+5:30

या योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी ₹67,34,534 पर्यंत निधी सहज जोडू शकता.

There is no tension about the girl childs future rs 6734534 fund will be available in a few years know how much you need to invest | Children’s Day 2023: मुलीच्या भविष्याचं टेन्शन नाही, काही वर्षांत जमेल ₹६७,३४,५३४ फंड; इतकी करावी लागेल गुंतवणूक

Children’s Day 2023: मुलीच्या भविष्याचं टेन्शन नाही, काही वर्षांत जमेल ₹६७,३४,५३४ फंड; इतकी करावी लागेल गुंतवणूक

Children’s Day 2023: दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children’s Day) साजरा केला जातो. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवसही असतो. पंडित नेहरूंना लहान मुलं खुप आवडायची. मुलं त्यांना प्रेमानं चाचा नेहरू म्हणायची. त्यामुळे दरवर्षी पंडित नेहरूंचा जन्मदिवस (awaharlal Nehru Birthday) बालदिन म्हणून साजरा केला जातो. आज बालदिनानिमित्त आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेबद्दल (Sukanya Samriddhi Yojana- SSY) सांगणार आहोत.

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशानं ही योजना चालवली जाते. जर तुम्ही मुलीचे पालक असाल, तर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आणि शक्य तितक्या लवकर यामध्ये गुंतवणूक करणं सुरू करा. या योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी ₹67,34,534 पर्यंत निधी सहज जोडू शकता.

8 टक्के व्याज
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो, अशा परिस्थितीत गुंतवलेले पैसे वेगाने वाढतात. जर तुमच्या मुलीचं वय 10 वर्षांपर्यंत असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत तिच्या नावावर खाते उघडू शकता. सध्या या योजनेत 8 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे.

असे जमा होतील 67,34,534 रुपये
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करायचे असल्यास, तुम्हाला दरमहा किमान 12,500 रुपये वाचवावे लागतील. या योजनेत तुम्हाला 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना 21 वर्षांनी मॅच्युअर होईल. अशा परिस्थितीत 15 वर्षात एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये होईल, परंतु तुम्हाला त्यावर 44,84,534 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 67,34,534 रुपये मिळतील. हे पैसे तुम्ही तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खर्च करू शकता.

टॅक्स बेनिफ्टस
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना 2023 मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला 21 वर्षांनी मॅच्युरिटी रक्कम मिळेल. अशा परिस्थितीत ही योजना 2044 मध्ये मॅच्युअर होईल. सुकन्‍या समृद्धी योजनेच्या व्याजदरांटा तिमाही आधारावर आढावा घेतला जातो. यामध्ये, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट देखील उपलब्ध आहे. तुम्ही कमाल 1.50 लाख रुपयांवर कर सवलतीचा दावा करू शकता.

Web Title: There is no tension about the girl childs future rs 6734534 fund will be available in a few years know how much you need to invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.