Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओएनजीसीतून निर्गुंतवणूक नाही

ओएनजीसीतून निर्गुंतवणूक नाही

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची (ओएनजीसी) पाच टक्के निर्गुंतवणूक २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता नाही

By admin | Published: February 9, 2015 12:46 AM2015-02-09T00:46:10+5:302015-02-09T00:46:10+5:30

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची (ओएनजीसी) पाच टक्के निर्गुंतवणूक २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता नाही

There is no divestment from ONGC | ओएनजीसीतून निर्गुंतवणूक नाही

ओएनजीसीतून निर्गुंतवणूक नाही

नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची (ओएनजीसी) पाच टक्के निर्गुंतवणूक २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता नाही. नुकतीच कोल इंडियातून मोठी निर्गुंतवणूक करण्यात आल्यामुळे बाजारात तरलतेवर दडपण आहे व अनुदानाचा प्रश्नही सुटलेला नाही.
कोल इंडियातील निर्गुंतवणूक व एचडीएफसी बँकेकडून निधी गोळा करण्यात आल्यानंतर बाजारातील रोख रक्कम कमी झाली आहे. या परिस्थितीत खास करून परकीय संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याची शक्यता नाही. गेल्या ३० जानेवारी रोजी सरकारने कोल इंडिया लिमिटेडमधील १० टक्के मालकी विकून २२,५५८ कोटी रुपये मिळविले होते. त्यात एक तृतीयांश भाग हा परकीय संस्थागत गुंतवणूकदारांकडून आलेला आहे.

 

Web Title: There is no divestment from ONGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.