नवी दिल्ली : सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे १.६० रुपये आणि ४० पैसे प्रतिलिटर वाढ केली आहे. असे असले तरीही बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या या दोन वस्तूंच्या दरात वाढ होणार नाही. उत्पादन शुल्कातील ही वृद्धी काही दिवस स्वत:च सहन करण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला
आहे.
अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि अतिरिक्त महसूल जमा करण्याच्या हेतूने सरकारने शुक्रवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढविले. या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कोणतीही वाढ केली जाणार नाही आणि त्याचा ग्राहकांवर बोजा पडणार नाही, असे सरकारी तेल कंपनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.
उत्पादन शुल्क वाढविल्याने उर्वरित वित्तीय वर्षात सरकारला ३२०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त महसूल मिळेल. सरकारने २०१४-१५ मध्ये उत्पादन शुल्काद्वारे एकूण ९९,१८४ कोटी रुपये प्राप्त केले होते. चालू वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत सरकारला ३३,०४२ कोटी रुपये मिळाले आहेत.
सीबीईसीच्या अधिसूचनेनुसार सामान्य पेट्रोलवर मूळ उत्पादन शुल्क ५.४६ रुपये प्रति लिटरवरून वाढवून ७.०६ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. अतिरिक्त आणि विशेष उत्पादन शुल्क सामील करण्याने पेट्रोलवरील शुल्क १९.०६ रुपये प्रतिलिटर झाले आहे. ते यापूर्वी १७.४६ रुपये प्रतिलिटर होते.
त्याचवेळी सामान्य डिझेलवरील उत्पादन शुल्क ४.२६ रुपये प्रतिलिटरवरून वाढवून ४.६६ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. विशेष उत्पादन शुल्क सामील केल्यानंतर डिझेलवरील एकूण उत्पादन शुल्क १०.६६ रुपये प्रतिलिटर होईल. सध्या ते १०.२६ रुपये प्रतिलिटर होते.
उत्पादन शुल्क वाढले तरी दरवाढ नाही
सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे १.६० रुपये आणि ४० पैसे प्रतिलिटर वाढ केली आहे. असे असले तरीही बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या
By admin | Published: November 8, 2015 01:49 AM2015-11-08T01:49:11+5:302015-11-08T01:49:11+5:30