नवी दिल्ली : गव्हाच्या आयातीवरील कर वाढवून २५ टक्के करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्त सरकारच्या विचाराधीन नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे.
पासवान यांनी म्हटले की, सध्या गव्हावर १0 टक्के आयात कर (सीमा शुल्क) लावण्यात आला आहे. कर कमी असला, तरी विदेशातून गव्हाची कोणतीही आयात होताना दिसत नाही. त्यामुळे कर वाढविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
२८ मे रोजी गव्हावर १0 टक्के आयात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यंदा देशात विक्रमी ९८ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे किमतींवर आधीच दबाव आहे. त्यातच गव्हाची आयात झाल्यास किमती घसरून शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर गव्हावर आयात कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्या आधी सुमारे चार महिने गव्हाच्या आयातीवर कोणताही कर नव्हता. आयात नि:शुल्क केली जात होती. देशांतर्गत उत्पन्न वाढल्यामुळे आयात कर लावण्याची मागणी जोर धरू लागताच, सरकारने कर लावण्याचा निर्णय जाहीर केला.
पासवान म्हणाले की, सध्या मध्यम स्वरूपात आयात कर लावलेला असतानाही विदेशातून गव्हाची आयात केली जात नाही. विदेशात कोणत्याही प्रकारे गहू खरेदी नसल्यामुळे आणखी कर वाढविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, शिवाय कर वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.
गव्हावरील आयात कर वाढविण्याचा तूर्त विचार नाही
गव्हाच्या आयातीवरील कर वाढवून २५ टक्के करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्त सरकारच्या विचाराधीन नाही
By admin | Published: May 1, 2017 01:25 AM2017-05-01T01:25:01+5:302017-05-01T01:25:01+5:30