नवी दिल्ली : देशातील बॅंकिंग व्यवहारातून चेकबुकची सुविधा बंद करण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकार चेकद्वारे होणारे व्यवहार रद्द करणार असल्याची चर्चा होती. मात्र, यासंबंधी कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे. देशात नोटबंदी केल्यानंतर डिजीटल व्यवहारांना चालना मिळावी, यासाठी नरेंद्र मोदी सरकार आता चेकबुक बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. बँकांमधील देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्णपणे डिजिटलपद्धतीने व्हावेत, यासाठी चेकबुक बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे चेकबुक लवकरच इतिहासजमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.
बँक व्यवहारातून चेकबुकची सुविधा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - अर्थ मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 9:20 PM