Join us  

नोटाबंदीमुळे मंदी नाही

By admin | Published: January 10, 2017 12:44 AM

नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर

 नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत चांगली वाढ झाली आहे. वस्तू उत्पादनासह सर्व क्षेत्रांत आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी येथे केला. अरुण जेटली म्हणाले की, एप्रिल ते डिसेंबर २0१६ या काळात प्रत्यक्ष करांची वसुली १२.0१ टक्क्यांनी वाढून ५.५३ लाख कोटींवर गेली. याच काळात अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत आदल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६.३0 लाख कोटींचा अप्रत्यक्ष कर या काळात वसूल झाला.अर्थमंत्री जेटली यांनी विविध क्षेत्रांतील अप्रत्यक्ष करांच्या वसुलीचे आकडे जाहीर केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात उत्पादन शुल्क ४३ टक्क्यांनी वाढून २.७९ लाख कोटी झाले. सेवा कराची प्राप्ती २३.९ टक्क्यांनी वाढून १.८३ लाख कोटी झाली. सीमा शुल्क प्राप्ती ४.१ टक्क्यांनी वाढून १.६७ लाख कोटी झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्या वेळी त्यांनी ३0 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मुदत होती. या काळात देशात चलनी नोटांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली होती. तसेच नोटाबंदीमुळे व्यापार-उदीम ठप्प झाल्याचा तसेच देशाच्या वृद्धी दरावर त्याचा आरोप करण्यात आाल होता. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेत मंदी आलेली नाही आणि येणारही नाही, असे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)