Join us  

काळा पैसा योजनेसाठी कोणतेही उद्दिष्ट नाही

By admin | Published: August 09, 2016 3:36 AM

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रकटिकरण योजनेसाठी रकमेचे कोणतेही उद्दिष्ट केंद्रीय थेट कर बोर्डाने ठरविलेले नाही, अशी माहिती बोर्डाच्या एका सदस्याने दिली.

कोलकता : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रकटिकरण योजनेसाठी रकमेचे कोणतेही उद्दिष्ट केंद्रीय थेट कर बोर्डाने ठरविलेले नाही, अशी माहिती बोर्डाच्या एका सदस्याने दिली.केंद्रीय थेट कर बोर्डाचे सदस्य गोपाल मुखर्जी यांनी सांगितले की, किती काळा पैसा बाहेर आणायचा यासंबंधी कोणतेही उद्दिष्ट बोर्डाने ठरविलेले नाही. तथापि, या योजनेखाली जास्तीत जास्त काळा पैसा बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कर बुडव्यांशी संपर्क करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. कर बुडविणाऱ्यांसाठी कारवाई टाळण्याची ही सुवर्ण संधी आहे. थेट कर व्यवसायिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनानिमित्त मुखर्जी कोलकत्यात आले होते. काळा पैसा योजनेचा प्रचार करणे हा त्यांच्या या दौऱ्यामागील हेतू होता. वार्षिक माहिती विवरण पत्र (एआयआर) व्यवस्थेनुसार विविध प्रकारच्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला मिळत आहे. या माहितीच्या आधारावर कारवाई केली जात आहे. बचत खात्यात १0 लाखांपेक्षा जास्त रकम भरणे, ३0 लाखांपेक्षा जास्त रकमेचे खरेदी विक्री व्यवहार करणे अशा व्यवहारांचा यात समावेश आहे. या पैकी अनेक व्यवहार पॅन क्रमांकाशिवायच करण्यात आले आहेत. विना पॅनच्या ९0 लाख व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे आहे. २00९-१0 ते २0१६-१७ या काळातील हे व्यवहार आहेत. असे व्यवहार करणाऱ्या लोकांना नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत ते हे व्यवहार स्वीकारू अथवा नाकारू शकतील. (वृत्तसंस्था)