शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशी
परकीय वित्तसंस्थांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास केलेली सुरुवात, भारतीय उद्योग क्षेत्राची काहीशी निराशेची कामगिरी आणि वाढलेल्या बाजारात नफा कमविण्याचा होत असलेला प्रयत्न अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध पवित्र्यातही बाजाराने नोंदविलेली साप्ताहिक वाढ उल्लेखनीय आहे. आता जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे ते अमेरिकन आणि युरोपियन बॅँकेच्या अध्यक्षांकडे.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाचा सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. ३१६७८.१९ ते ३१२२०.५३ या दरम्यान खाली-वर होत हा निर्देशांक सप्ताहाच्या
अखेरीस ३१५९६.०६ अंशांवर बंद झाला. गतसप्ताहाच्या बंद निर्देशांकाशी तुलना करता त्यामध्ये अवघी ७१.३८ अंशांची वाढ
झाली आहे. या निर्देशांकातील
१७ आस्थापनांच्या समभागांमध्ये
वाढ झाली तर १४
आस्थापनांच्या समभागांच्या किमती कमी झाल्या.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १९.६५ अंश म्हणजेच ०.२० टक्क्यांनी वाढून ९८६४.२५ अंशांवर बंद झाला. सप्ताहादरम्यान हा निर्देशांक ९८८४.३५ ते ९७२०.१० अंशांच्या दरम्यान हेलकावत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झालेली दिसून आली. मुंबई तसेच राष्टÑीय शेअर बाजारांमधील उलाढाल गतसप्ताहापेक्षा कमी झाली. शुक्रवारी बाजाराला गणेश चतुर्थीची सुटी असल्याने आठवड्यात केवळ चार दिवसच कामकाज झाले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिसने समभागांच्या फेरखरेदीची केलेली घोषणा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नंदन निलेकणी यांची केलेली नियुक्ती यामुळे या आस्थापनेचे समभाग काहीसे वाढले. मात्र बाजारात सर्वत्र विक्रीचेच वारे दिसत आहेत.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन सेंट्रल बॅँकेच्या अध्यक्षांच्या भाषणाकडे आता जगाचे डोळे लागले आहेत. यामधून या देशांची पुढची दिशा स्पष्ट होणार असून त्यानंतर जगभरातील बाजारांची आगामी दिशाही निश्चित होऊ शकेल.
सावध वाटचालीमध्येही निर्देशांकात किंचित वाढ
परकीय वित्तसंस्थांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास केलेली सुरुवात, भारतीय उद्योग क्षेत्राची काहीशी निराशेची कामगिरी आणि वाढलेल्या बाजारात नफा कमविण्याचा होत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:49 AM2017-08-28T02:49:44+5:302017-08-28T02:49:49+5:30