नवी दिल्ली : करदात्यांच्या सुविधेसाठी चालू आर्थिक वर्षात विविध राज्यांतून एकूण ७० नवीन कार्यालये सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला असून, याच्या अंमलबजावणीस लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये नाशिक आणि लातूर अशा महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे.
सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात प्रत्यक्ष करदात्यांची वाढती संख्या लक्षात घेता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना कर विषयक विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी या नवीन कार्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. तक्रारी, पॅन सुविधा आदींचे काम प्रामुख्याने होणार आहे. सध्या देशामध्ये १८९ शहरांतून विभागाची कार्यालये आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्राप्तिकराची देशभर ७० नवीन कार्यालये होणार
करदात्यांच्या सुविधेसाठी चालू आर्थिक वर्षात विविध राज्यांतून एकूण ७० नवीन कार्यालये सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला
By admin | Published: July 3, 2014 05:15 AM2014-07-03T05:15:00+5:302014-07-03T05:15:00+5:30