नवी दिल्ली - भारतात सॅटेलाइट ब्राॅडबॅंडसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव हाेणार नाही. त्याचे नियामकाने निश्चित केलेल्या ठरावीक दराने वाटप हाेईल, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले.
सिंधिया म्हणाले की, प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे पालन करावे लागते. ही संघटना अंतराळ किंवा सॅटेलाईट स्पेक्ट्रमचे धाेरण ठरविले. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सॅटेलाइट किंवा अंतराळातील स्पेक्ट्रमचा लिलाव केला जात नाही. जगात काेणत्याही देशात लिलावाद्वारे या स्पेक्ट्रमचे वाटप हाेत नाही. सॅटेलाइट ब्राॅडबॅंड स्पेक्ट्रम हे माेफत मिळणार नाही. दूरसंचार नियामक ‘ट्राय’ त्याचे दर निश्चित करेल आणि त्यानंतर विक्री हाेईल, असेही सिंधिया यांनी स्पष्ट केले.
भारतात काही कंपन्या या स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाद्वारे व्हावे, अशी मागणी करीत आहेत. ठराविक किमतीत वाटप केल्यास या क्षेत्रात असमताेल निर्माण हाेईल, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.