Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोकणात केमिकल झोन होणार नाही

कोकणात केमिकल झोन होणार नाही

विनायक राऊत : मुख्यमंत्री भाषणाच्या ओघात बोलले

By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:36+5:302015-10-03T00:20:36+5:30

विनायक राऊत : मुख्यमंत्री भाषणाच्या ओघात बोलले

There will be no chemical zone in Konkan | कोकणात केमिकल झोन होणार नाही

कोकणात केमिकल झोन होणार नाही

नायक राऊत : मुख्यमंत्री भाषणाच्या ओघात बोलले
सावंतवाडी : कोकणात केमिकल झोन होणार नाही. नागपूरमध्ये उद्योजकांच्या बैठकीत भाषणाच्या ओघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले असून, त्यांनी याबाबतचा आमच्याकडे खुलासा केला आहे. त्यामुळे केमिकल झोनचा विषय संपला आहे, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी सांगितले.
पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी खा. राऊक बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानभरपाई देत असताना एका सात-बारावर मोठ्या प्रमाणात नावे असल्याने कोणाला नुकसानभरपाई द्यावी, असा प्रश्न येतो. पण आता हा प्रश्न निकाली निघाला असून, पूर्वीप्रमाणे हमीपत्राद्वारे ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली. (प्रतिनिधी)

Web Title: There will be no chemical zone in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.