जर तुम्ही कोरोना काळात घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. २३ मे रोजी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT सेवा काही वेळासाठी बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. सध्या छोट्या मोठ्या देवाणघेवाणीसाठी युपीआयला अनेकांची पसंती असते.
परंतु याद्वारे देवाणघेवाण सरासरी १ हजार रूपयांवर कायम आहे. कोरोना काळात आयएमपीएस (IMPS) द्वारे सरासरी ९ हजार रूपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन्स करण्यात आली. यापूर्वी ती ६ ते ७ हजारांच्या दरम्यान होती.
NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021
रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी रात्री ००.०१ मिनिटांपासून दुपारी १४.०० वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत NEFT सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आरटीजीएस प्रमाली मात्र सुरू राहिल. आरटीजीएससाठी याप्रकारचं अपडेट यापूर्वी १८ एप्रिल २०२१ रोजी पूर्ण करण्यात आलं होतं. अनेक जण मोठी रक्कम देण्यासाठी NEFT सेवेचा वापर करतात. या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही.