Join us

२३ मे रोजी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडचण; 'या' वेळेत NEFT सेवा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 3:39 PM

Reserve Bank Of India NEFT : रिझर्व्ह बंकेनं ट्विटरद्वारे दिली माहिती.

ठळक मुद्देरिझर्व्ह बंकेनं ट्विटरद्वारे दिली माहिती.रविवारी मध्यरात्रीपासून NEFT सेवा राहणार बंद

जर तुम्ही कोरोना काळात घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. २३ मे रोजी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT सेवा काही वेळासाठी बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. सध्या छोट्या मोठ्या देवाणघेवाणीसाठी युपीआयला अनेकांची पसंती असते. 

परंतु याद्वारे देवाणघेवाण सरासरी १ हजार रूपयांवर कायम आहे. कोरोना काळात आयएमपीएस (IMPS) द्वारे सरासरी ९ हजार रूपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन्स करण्यात आली. यापूर्वी ती ६ ते ७ हजारांच्या दरम्यान होती.  रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी रात्री ००.०१ मिनिटांपासून दुपारी १४.०० वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत NEFT सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आरटीजीएस प्रमाली मात्र सुरू राहिल. आरटीजीएससाठी याप्रकारचं अपडेट यापूर्वी १८ एप्रिल २०२१ रोजी पूर्ण करण्यात आलं होतं. अनेक जण मोठी रक्कम देण्यासाठी NEFT सेवेचा वापर करतात. या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसाऑनलाइन