Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता येणार ‘वीज फिल्टर’, यूपीएसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोलार पॅनेलचाही उपयोग

आता येणार ‘वीज फिल्टर’, यूपीएसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोलार पॅनेलचाही उपयोग

पाण्याच्या फिल्टरप्रमाणेच आता ‘वीज फिल्टर’ ही संकल्पना बाजारात आली आहे. इलेक्ट्रिक उपकरणे दीर्घकाळ टिकण्यासाठी यूपीएसमध्ये हे तंत्रज्ञान येत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:51 AM2018-04-04T00:51:29+5:302018-04-04T00:51:29+5:30

पाण्याच्या फिल्टरप्रमाणेच आता ‘वीज फिल्टर’ ही संकल्पना बाजारात आली आहे. इलेक्ट्रिक उपकरणे दीर्घकाळ टिकण्यासाठी यूपीएसमध्ये हे तंत्रज्ञान येत आहे.

There will now be a 'power filter', the latest technology in UPS, and the use of solar panels | आता येणार ‘वीज फिल्टर’, यूपीएसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोलार पॅनेलचाही उपयोग

आता येणार ‘वीज फिल्टर’, यूपीएसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोलार पॅनेलचाही उपयोग

मुंबई - पाण्याच्या फिल्टरप्रमाणेच आता ‘वीज फिल्टर’ ही संकल्पना बाजारात आली आहे. इलेक्ट्रिक उपकरणे दीर्घकाळ टिकण्यासाठी यूपीएसमध्ये हे तंत्रज्ञान येत आहे.
विजेचा पुरवठा खंडित झाल्यास इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद पडू नये, यासाठी कार्यालये, घर, दुकान येथे यूपीएस लावले जातात. आता
हेच यूपीएस वीज शुद्ध करण्यासाठीही वापरले जाऊ शकणार आहे, असे न्युमेरिक यूपीएस या फ्रेन्च
कंपनीचे सीईओ पलाश नंदी यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत वर्षभरात सरासरी ४ मिनिटे वीज जाते, पण यूपीएसची सर्वाधिक मागणी तेथेच आहे. कारण अत्याधुनिक यूपीएस तंत्रज्ञान तेथे आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वीज यूपीएसद्वारे शुद्ध केल्यानंतरच पुरविली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे यूपीएसला जोडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दीर्घकाळ टिकू शकतील. त्यामुळे आता वीजपुरवठा सुरू असतानाही शुद्ध विजेसाठी यूपीएस उपयुक्त ठरतील, असे नंदी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भारतीय यूपीएसची बाजारपेठ जवळपास १,१०० कोटी रुपयांची आहे. बॅटरी आणि यूपीएस यांचा संयुक्त बाजार २,२०० कोटी रुपयांचा आहे.

आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अर्थात, ‘एआय’चा सर्वच क्षेत्रातील प्रभाव वाढत आहे. हेच ‘एआय’ यूपीएस प्रणालीतही येत आहे. एका अ‍ॅपच्या माध्यमातून यूपीएस सुरू किंवा बंद करता येणारे तंत्रज्ञान येत आहे.

Web Title: There will now be a 'power filter', the latest technology in UPS, and the use of solar panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.