Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज

घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:28 PM2023-05-08T17:28:40+5:302023-05-08T17:29:18+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.

these 10 banks offering cheaper home loan interest rate | घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज

घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज

सध्या महागाईच्या काळात स्वत:चे घर खरेदी करणे, हे लोकांचे स्वप्न बनले आहे. पण हे स्वप्न ते पूर्ण करू शकतात. तुम्हीही महागाईच्या काळात स्वतःचे घर खरेदी करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्याचा तुमच्या कर्जाच्या EMI आणि व्याजदरांवर थेट परिणाम होतो. 

असे असतानाही अनेक बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. तुम्हालाही स्वतःचे घर घ्यायचे असेल तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची माहिती देणार आहोत जिथे तुम्हाला स्वस्त व्याजदरात गृहकर्ज मिळत आहे.

गेल्या वर्षी आरबीआयने रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवला होता. जो सलग 6 वेळा वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आता रेपो रेट 6.50 च्या स्तरावर पोहोचला आहे. दर महिन्याला तुमच्या EMI वर व्याजदरांचा थेट परिणाम होतो. व्याजदर जितका जास्त असेल तितका जास्त EMI तुम्हाला भरावा लागेल. दरम्यान, तुम्हाला कोणत्या 10 बँकांवर कमी व्याजदराची ऑफर मिळत आहे, त्याबद्दल जाणून घ्या...

'या' 10 बँकांमध्ये मिळत आहे स्वस्त व्याज! 
इंडसइंड बँक – 8.4%
इंडियन बँक – 8.45%
एचडीएफसी बँक – 8.45%
युको बँक – 8.45%
बँक ऑफ बडोदा – 8.5%
बँक ऑफ महाराष्ट्र – 8.75%
युनियन बँक ऑफ इंडिया – 8.75%
आयडीबीआय बँक – 8.75%
पंजाब नॅशनल बँक – 8.8%
कोटक महिंद्रा बँक – 8.85%

Web Title: these 10 banks offering cheaper home loan interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.