नवी दिल्ली : स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल आणि तुम्हाला गृहकर्जाची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयच्या पतधोरण बैठकीनंतर अनेक बँकांनी आपल्या गृहकर्जावरील व्याजात कपात केली आहे. त्याचा फायदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला अशा 10 बँकांबद्दल माहिती देत आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहेत. दरम्यान, गृह कर्ज हा किरकोळ कर्जाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये घराची एकूण किंमत EMI म्हणजेच सुलभ हप्त्यांमध्ये विभागली जाते. हा EMI साधारणपणे 20 वर्षांसाठी असतो. घराची किंमत 20 वर्षांपर्यंत सुलभ हप्त्यांमध्ये भरल्यास, खरेदीदारांना घर खरेदी करणे सोपे होते.
या बँकांमध्ये मिळतंय स्वस्त गृहकर्ज
इंडियन बँक - 8.45 टक्क्यांपासून ते 9.1 टक्क्यांपर्यंत
HDFC बँक - 8.45 टक्क्यांपासून ते 9.85 टक्क्यांपर्यंत
इंडसइंड बँक - 8.5 टक्क्यांपासून ते 9.75 टक्क्यांपर्यंत
पंजाब नॅशनल बँक - 8.6 टक्क्यांपासून ते 9.45 टक्क्यांपर्यंत
बँक ऑफ महाराष्ट्र – 8.6 टक्क्यांपासून ते 10.3 टक्क्यांपर्यंत
बँक ऑफ बडोदा – 8.6 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत
बँक ऑफ इंडिया - 8.65 टक्क्यांपासून ते 10.6 टक्क्यांपर्यंत
कर्नाटक बँक – 8.75 टक्क्यांपासून ते 10.43 टक्क्यांपर्यंत
युनियन बँक ऑफ इंडिया - 8.75 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत
कोटक महिंद्रा बँक - 8.85 टक्क्यांपासून ते 9.35 टक्क्यांपर्यंत
गृहकर्ज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करावे. बचत आणि खर्च करूनही दर महिन्याला पैसे उरत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गृहकर्जाचा विचार करू शकता.