Join us

रेल्वेच्या दोन शेअर्ससह 'या' ३ स्टॉक्सनं तीन दिवसांत पकडला रॉकेट स्पीड, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:37 AM

गेल्या काही दिवसांत रेल्वेशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून येत आहे.

Price Shockers Stocks: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. पण गेल्या तीन दिवसांत तीन स्टॉक्स प्राईज शॉकर्स राहिले. यामध्ये RVNL आणि IRFC या कंपन्यांच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला होता. तर आयटी कंपनी ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. या तीन कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या तीन दिवसांत 32 ते 45 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.सहा महिन्यांत 430 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्नसर्वप्रथम, जर आयआरएफसी (Indian Railway Finance Corporation) बद्दल बोलायचं झालं तर, या स्टॉकनं केवळ 3 दिवसात 45 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या 7 दिवसांत त्यात सुमारे 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर आपण गेल्या 15 दिवसांच्या कामगिरीबद्दल बोललो तर या रेल्वे स्टॉकनं 82 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. शनिवारी त्यात 10 टक्क्यांची वाढ होऊन तो 176.25 रुपयांवर बंद झाला.गेल्या एका महिन्यात IRFC नं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. या कालावधीत या शेअरनं 90.64 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्याच वेळी, तीन महिन्यांत 128 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्यांनी सहा महिन्यांपूर्वी यात पैसे गुंतवले त्यांना 430 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.3 वर्षात आरवीएनएलमध्ये 936 टक्क्यांची वाढया यादीत दुसऱ्या स्थानी RVNL चा शेअर आहे. रेल विकास निगमनं अवघ्या तीन दिवसांत 35 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. केवळ गेल्या 7 दिवसांत, 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य 1.60 लाखांपेक्षा जास्त झालं आहे. या कालावधीत तो 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. अवघ्या 15 दिवसांत त्यात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शनिवारी हा शेअर 10 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 320.35 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात त्यात 86 टक्के आणि तीन महिन्यांत 90 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 12 महिन्यांत त्यात 317% आणि तीन वर्षांत 936% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.तिसर्‍या शेअर बद्दल बोलायचं झालं तर, ओरॅकलचा शेअर शनिवारी 2.57 टक्क्यांनी घसरून 6700.50 रुपयांवर बंद झाला असला तरी, गेल्या तीन दिवसांत तो 32 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या 7 दिवसात जवळपास या शेअरनं 55 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 15 दिवसांत सुमारे 60 टक्के परतावा दिला आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररेल्वे