Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2022 च्या पहिल्या काही आठवड्यात $85.1 अब्ज डॉलर (सुमारे 6354 अब्ज रुपये) गमावले आहेत. यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:13 PM2022-01-25T13:13:05+5:302022-01-25T13:13:30+5:30

तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2022 च्या पहिल्या काही आठवड्यात $85.1 अब्ज डॉलर (सुमारे 6354 अब्ज रुपये) गमावले आहेत. यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

These 5 billionaires lost 85 billion in January 2022, biggest loss to Elon Musk | 'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

सध्या अनेक देशात मंदीचे सावट आले आहे. या मंदीमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले असून, तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2022 च्या पहिल्या काही आठवड्यात तब्बल $85.1 अब्ज डॉलर (सुमारे 6354 अब्ज रुपये) गमावले लागले आहेत. गेल्या आठवड्यात बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे या उद्योगपतींना मोठा फटका बसला आहे.

एलोन मस्क यांना सर्वाधिक नुकसारन
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) यांना या वर्षात आतापर्यंत सुमारे 30.2 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांची नेट वर्थ 240 अब्ज डॉलरवर आली आहे. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत मस्कच्या संपत्तीत सुमारे 100 अब्ज डॉलरची घट झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क यांची एकूण संपत्ती 335 अब्ज डॉलर होती.

जेफ बेजोस यांनाही मोठा फटका
ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार, 1 जानेवारीपासून ऍमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस यांनी 2022 मध्ये सुमारे $22.8 अब्ज गमावले आहेत. बेझोस (Jeff Bezos) यांची संपत्ती 169 अब्ज डॉलरवर आली आहे. त्या पाठोपाठ फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना या काळात सुमारे 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 115 अब्ज डॉलरवर आली आहे. 

गुगलच्या सह-संस्थापकाचे मोठे नुकसान

गुगलचे (Google) सहसंस्थापक लॅरी पेज (Larry Page) यांची संपत्तीही 11.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 117 अब्ज डॉलरवर आली आहे. तर, मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना सुमारे 10.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 128 अब्ज डॉलरवर आली आहे. अशा प्रकारे, या वर्षात आतापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील पाच सर्वात मोठ्या श्रीमंतांनी $85.1 अब्ज गमावले आहेत.

यामुळे झाले नुकसान

टेक कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीमुळे या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. गेल्या आठवड्यात नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) सुमारे 8 टक्क्यांनी घसरला होता. व्याजदरात झालेली वाढ आणि वाढत्या महागाई दराशी संबंधित चिंतेमुळे ही घसरण नोंदवली जात आहे. नॅस्डॅक या वर्षी आतापर्यंत सुमारे 13 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: These 5 billionaires lost 85 billion in January 2022, biggest loss to Elon Musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.