Join us

Airtel च्या 'या' प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 5जी, ॲमेझॉन प्राईम, डिस्ने आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 6:27 PM

पाहा कोणते आहेत हे प्लॅन. आणखी कोणकोणती मिळतायत बेनिफिट्स.

भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या निवडक पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा सुविधा देण्याची घोषणा केली आहे. या सेवेनंतर, अशा ग्राहकांना ब्राउझिंग, स्ट्रीमिंग आणि त्यांचे आवडते शो पाहण्यासाठी हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेता येईल. याशिवाय एअरटेल आपल्या काही प्रीपेड प्लॅनवर Amazon Prime आणि Disney+ Hotstar चा मोफत ॲक्सेस देत आहे. पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स.

499 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 एसएमएससह अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित 5G इंटरनेट डेटाचा लाभ मिळतो. या व्यतिरिक्त यूजर्सना या प्लान मध्ये Disney + Hotstar चा ॲक्सेस देखील मिळतो. त्याच वेळी, ग्राहकांना Wynk म्युझिकसह अन्य ॲप्सचाही ॲक्सेस मिळतो.

699 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 56 दिवसांची वैधता देण्यात येते. याशिवाय ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये युझर्सना Amazon प्राइम मेंबरशिप तसेच Airtel Xstream ॲप आणि Wynk सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो.

839 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता देण्यात येते. यामध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. यासह, तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार मोबाइलचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन तसेच Xstream ॲप, रिवॉर्डस्मिनी सबस्क्रिप्शन, विंक सबस्क्रिप्शनचा लाभ देखील मिळेल.

999 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनमध्ये, युझर्सना 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित 5G इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय वापरकर्त्यांना ॲमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, विंक सब्सक्रिप्शन आणि रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो.

3359 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा, कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये, युझर्सना डिस्ने + हॉटस्टार मोबाइलचं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7 बेनिफिट आणि विंक सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो.

टॅग्स :एअरटेल