Join us

Income Tax Saving Tips: तुम्हाला टॅक्स बचत करायचीय? ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर; पाहा, सूट मिळण्याच्या खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 9:58 AM

Income Tax Saving Tips: काही गोष्टी केल्याने थोड्या प्रमाणात तुम्ही कर बचत करू शकता, असे सांगितले जाते.

नवी दिल्ली: चालु आर्थिक वर्ष समाप्त व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. देशभरातील कोट्यवधी लोकं नियमितपणे कर भरत असतात. आपण भरत असलेल्या कराचा फायदा सरकारला होत असून, परिणामी लोककल्याणकारी योजनांमध्ये त्याचा खूप लाभ होतो, असे म्हटले जाते. सरकारकडूनही कर भरण्याचे आवाहन केले जाते. तुम्हालाही टॅक्स वाचवता येऊ शकतो. परंतु, त्यासाठी ३१ मार्चपूर्वी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या गोष्टी केल्याने काही प्रमाणात तुम्ही कर बचत करू शकता, असे सांगितले जाते. 

आयकराच्या कलम ८० सी नुसार १.५० लाख रुपयांपर्यंतच सूट उपलब्ध करण्यात आली आहे. ही सूट आणखी वाढवण्यासाठी तुम्ही कलम ८०सीसीडी (१बी) चाही लाभ घेऊ शकता. यामध्ये ही सूट २ लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यासाठी तुम्हाला पीपीएफ आणि एनपीएस सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. तसेच तुम्ही कलम ८०डी अंतर्गत आरोग्य विम्यासाठी प्रीमियमचा दावा करू शकता. या पॉलिसीमध्ये कोणाचा समावेश आहे आणि त्यांचे वय काय आहे, यानुसार ८०डी अंतर्गत कर सूट मिळते. त्यामुळे तुम्ही २५ हजार, ५० हजार आणि १ लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा दावा करू शकता.

कर्ज परतफेडीवर कर सवलत

तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल, तर त्या कर्जाच्या परतफेडीवर कर सवलतीचा दावा करू शकता. कलम ८० ई अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सूट मिळू शकते. या कर सवलतीचा लाभ मुलांपासून पालकांना घेता येऊ शकतो. मात्र, कर्ज परतफेड कोण करत आहे, यावर ते अवलंबून आहे. कर सवलतीची मर्यादा नाही. तुम्हाला पाहिजे तितक्या व्याजावर तुम्ही कर सूट मागू शकता, असे सांगितले जाते. 

दरम्यान, याशिवाय तुम्ही धर्मादाय (चॅरिटी) दान करत असाल, तर तुम्हाला याद्वारे आयकर सूट मिळू शकते. चॅरिटीसाठी काही देणग्यांवर १०० टक्के, तर काहींना ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. २००० रुपये रोख आणि त्याहून अधिक रकमेच्या धनादेशाद्वारे धर्मादाय संस्थेला दिलेल्या देणग्यांवर आयकर सूट उपलब्ध आहे. अशा प्रकारे कर बचत करून आयकरावर सूट मिळवू शकता, असे सांगितले जाते.  

टॅग्स :इन्कम टॅक्स