लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणूकदारांना कायम खुणावत असते. सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर असो किंवा आलिशान बंगला अथवा सदनिका, प्रत्येकालाच त्याची भुरळ पडते. गुंतवणूकदारांसोबतच या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे मालकही श्रीमंत झाले आहेत. सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट व्यावसायिक कोण, असा प्रश्न पडला असेल. तर, डीएलएफचे चेअरमन राजीव सिंह हे ५९,०३० कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वाधिक श्रीमंत रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते या स्थानावर कायम आहेत. ‘ग्रोहे-हुरुन इंडिया’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालात ६७ कंपन्या आणि १६ शहरांतील १०० लोकांना मानांकन देण्यात आले आहे. ६१ टक्के लोकांच्या संपत्तीत वाढ तर ३६ टक्के लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे. २५ नवे चेहरेही यात दाखल झाले आहेत. पहिल्या १०मध्ये मुंबईतील चार व्यावसायिकांचा समावेश आहे.
५९,०३०
राजीव सिंह, डीएलएफ
४२,२७०
मंगल प्रभात लोढा
मॅक्रोटेक डेव्हलपर्स
३७,०००
अर्जुन मेंडा
आरएमझेड कॉर्प
२६,६२०
चंद्रू रहेजा
के. रहेजा
२३,९००
निरंजन हिरानंदानी
हिरानंदानी कम्युनिटिज