येत्या १ सप्टेंबरपासून ४ मोठे बदल होणार असून, त्याचा लोकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. केवायसी नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच केवायसीअभावी पीएनबीतील खातेही सुरू राहणे कठीण होऊ शकते.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना ३१ ऑगस्टपूर्वी ई - केवायसी आवश्यक करण्यात आले आहे. केवायसी नसेल तर या योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यास मिळणार नाही. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. दर ४ महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांना खात्यावर थेट जमा केले जातात. आजपर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून, १२वा हप्ता देय आहे.
पंजाब नॅशनल बँकेत केवायसी बंधनकारकपंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी केवायसी बंधनकारक केले आहे. बँकेने म्हटले की, सर्व ग्राहकांनी ३१ ऑगस्टपूर्वी केवायसी करून घ्यावे. त्यासाठी ग्राहक बँकेच्या शाखेत संपर्क साधू शकतात. ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी केले नाही, तर ग्राहकांना आपल्या खात्यातील पैसे काढता किंवा भरता येणार नाहीत.
‘यमुना एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागलादिल्लीला जाण्या - येण्यासाठी जे लोक ‘यमुना एक्स्प्रेस वे’चा वापर करतात, त्यांच्यासाठी प्रवास महाग होऊ शकतो. कारण आता या महामार्गावर अधिक टोल भरावा लागणार आहे. नव्या दरानुसार, कार, जीप, व्हॅन व इतर हलक्या वाहनांसाठी या महामार्गावरील टोलचा दर आता २.५० रुपये प्रतिकिलोमीटरवरून वाढवून २.६५ रुपये प्रतिकिलोमीटर केला आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी तसेच हलकी मालवाहतूक वाहने आणि मिनी बस यांसाठी टोलचा दर ४.१५ रुपये प्रतिकिलोमीटर असेल. बस आणि ट्रक यांसारख्या मोठ्या वाहनांसाठी टोल ८.४५ रुपये प्रतिकिलोमीटर असेल.