Join us

Twitter, Meta मधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय CEO नोकरी देणार, म्हणाले...मायदेशी परत या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:57 PM

Indian Tech CEO Offers Jobs: अमेरिकेत मोठ्या कर्मचारी कपातीनंतर आता भारतीय सीईओ हर्ष जैन यांनी ट्विटर, मेटाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Indian Tech CEO Offers Jobs: अमेरिकेत मोठ्या कर्मचारी कपातीनंतर आता भारतीय सीईओ हर्ष जैन यांनी ट्विटर, मेटाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेत ५२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले. पण त्यातील सर्व भारतीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरी परतावं आणि पुढील दशकात भारतीय तंत्रज्ञान प्रगत करण्यास मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ड्रीम स्पोर्ट्स नेहमीच हरहुन्नरी टॅलेंटच्या शोधात असतं आणि विशेषत: डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञानातील नेतृत्वाचा अनुभव असलेल्यांना चांगली संधी उपलब्ध करुन देण्याची तयारी आहे. सध्या टेक लेऑफमुळे जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

यूएसमधील घटती कमाई, कमी जाहिरातदार आणि निधी यामुळे अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा मार्ग स्वीकारलं आहे. मेटाला ११,००० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, जे टेक जायंटच्या कर्मचार्‍यांपैकी सुमारे १३% इतकं प्रमाण आहे. मेटानं या वर्षी कंपनी मूल्याच्या जवळपास ७० टक्के रक्कम पाण्यासारखी खर्च केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ट्रिलियन डॉलर्सवरून २५५.७९ अब्जपर्यंत डॉलरपर्यंत घसरलं आहे.

इलॉन मस्कने ट्विटरवर ताबा घेतल्यानंतर कंपनीच्या निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं. मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, झिलो आणि स्पॉटीफाय यांनीही त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

भारतीय कंपनी ड्रीम-११ चे सीईओ आहेत हर्ष जैनहर्ष जैन यांनी आपल्या भारतीय कंपन्या नफ्यात असल्याचा दावा केला आहे. आम्ही ड्रीम स्पोर्ट्समध्ये १५० दशलक्ष युझर्स असलेली ८ अब्ज डॉलरची नफा कमावणारी कंपनी आहोत आणि Fantasy Sports, NFT, Sports OTT, Fintech मधील 10 kickass पोर्टफोलिओ कंपन्या आहोत. Dream11 हे एक फँटसी गेम प्लॅटफॉर्म आहे जे युझर्सना क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बर्‍याच गोष्टींमध्ये फॅटन्सी संघ तयार करण्याची संधी उपलब्ध करुन देते. 

Dream11 ही भारतातील पहिली गेमिंग कंपनी होती जी युनिकॉर्न कंपनी बनली. हर्ष जैन हे अशा अनेक भारतीय टेक लीडर्सपैकी एक आहेत जे भारतात कुशल प्रतिभा परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यात स्वदेशी तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत आणि अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशातील तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.

टॅग्स :नोकरी