Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारच्या गॅरंटीवर गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, येथे मिळेल FD हून अधिक परताव्याची हमी!

सरकारच्या गॅरंटीवर गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, येथे मिळेल FD हून अधिक परताव्याची हमी!

तर जाणून घेऊयात, गुंतवणूकीच्या अशाच तीन पर्यायांसंदर्बात, जे आपल्याला उत्तम परतावा देतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:18 PM2023-09-19T17:18:40+5:302023-09-19T17:19:54+5:30

तर जाणून घेऊयात, गुंतवणूकीच्या अशाच तीन पर्यायांसंदर्बात, जे आपल्याला उत्तम परतावा देतील.

These Investments offer More Than FD interest rates Get Guaranteed Returns | सरकारच्या गॅरंटीवर गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, येथे मिळेल FD हून अधिक परताव्याची हमी!

सरकारच्या गॅरंटीवर गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, येथे मिळेल FD हून अधिक परताव्याची हमी!

आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळावा आणि आपला पैसा सुरक्षित रहावा, असे सर्वांनाच वाटत असते. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता एफडीवरील परतावा हाय लेव्हलवर गेल्याने गुंतवणूकदार खूश आहेत. मोठ मोठ्या बँकांकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवर 7.5% चा व्याजदर ऑफर केला जात आहे. याशिवा काही लहान बँका 9 टक्क्यांपर्यंतही व्याजदर ऑफर करत आहेत.

एफडीवरील व्याजदरात गेल्या एका वर्षात वेगाने वाढ झाली आहे. मात्र याशिवायदेखील काही निश्चित गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जे आपल्याला चांगला परतावा देतात, हे आपल्याला माहीत आहे का? तर जाणून घेऊयात, गुंतवणूकीच्या अशाच तीन पर्यायांसंदर्बात, जे आपल्याला उत्तम परतावा देतील.

पोस्‍ट ऑफ‍िसमध्ये 5 वर्षांची एफडी -
पोस्‍ट ऑफ‍िसची एफडी हा न‍िश्‍च‍ित परताव्यासाठी एका चांगला पर्याय आहे. ही एफडीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. यात आपल्याला एक, दोन, तीन, आणि पाच वर्षांचा पर्याय मिळतो. यासाठी आपण कुठल्याही पोस्ट ऑफिसात जाऊन कितीही अकाउंट सुरू करू शकता. येथे एफडीसाठी किमान 200 रुपये आणि यानंतर, 200 रुपयांच्या पटीत पैसे असायला हवेत. जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी, 5-वर्षांच्या कालावधीवर 7.5 टक्के एवढा व्याजदर आहे.

पाच वर्षांचे एनएससी -
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात (NSC) पाच वर्षांचा लॉक-इन पीर‍िअर असतो. यात आपण एकटे अथवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकता. ही योजना आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार, आयकर कपातीसाठीही चांगली आहे. याथे व्याज दिले जात नाही, तर पुनर्गुंतवणूक केली जाते. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटवर 7.7% एवढा परतावा दिला जातो

RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड -
आरबीआय (RBI) सेव्हिंग बॉन्डवरील व्याजदर एनएससीच्या तुलनेत 0.35 टक्क्यांनी अधिक असतो. एनएससी व्याज दरातील कुठलाही बदल आरबीआय सेव्हिंग बॉन्‍डवर देण्यात येणाऱ्या व्याज दरावरून दिसू शकेल. सध्याचा एनएससी व्याजदरात 0.35 टक्क्यांनी अधिक केल्यास तो 8.05% होतो. RBI सेव‍िंग बॉन्‍डवर दर सहा महिन्याला व्याज दराची समीक्षा केली जाते. यात किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

Web Title: These Investments offer More Than FD interest rates Get Guaranteed Returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.