Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील 'या' बँका देतायत सीनिअर सीटिझन्सना देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा लिस्ट 

देशातील 'या' बँका देतायत सीनिअर सीटिझन्सना देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा लिस्ट 

एफडी मधील गुंतवणूक ही सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:21 PM2023-08-21T13:21:45+5:302023-08-21T13:22:18+5:30

एफडी मधील गुंतवणूक ही सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय आहे.

These small finance banks in the country are offering more than 9 percent interest to senior citizens see the list fixed deposit | देशातील 'या' बँका देतायत सीनिअर सीटिझन्सना देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा लिस्ट 

देशातील 'या' बँका देतायत सीनिअर सीटिझन्सना देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा लिस्ट 

FD Interest Rates: एफडी (Fixed Deposit) मधील गुंतवणूक ही सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज देत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देत आहेत.

१. इक्विटस स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ४४४ दिवसांच्या एफडीवर ९ टक्क्यांचं व्याज देणार आहे. बँकांचे हे व्याजदर २१ ऑगस्ट २०२३ पासून लागू झाले आहेत. 

२. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक २ ते ३ वर्षआंच्या एफडीवर ९ टक्के व्याज देत आहेत. बँकेच्या वेबसाईटनुसार हे दर १४ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आलेत.

३. ५००, ७५० आणि १००० दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक एफडीवर अनुक्रमे ९, ९.४३ आणि ९.२१ टक्क्यांचं व्याज दिलं जातंय. ३६ महिने १ दिवस ते ४२ महिन्यांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ९.१५ टक्क्यांचं व्याज दिलं जातंय. 

४. जन स्मॉल फायनान्स बँक १०९५ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९ टक्क्यांचं व्याज देत आहे. १५ ऑगस्ट २०२३ पासून हे दर लागू करण्यात आलेत. 

५. नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक ५५५ आणि ११११ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९.२५ टक्क्यांचं व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार हे व्याजदर ६ जून पासून लागू झाले आहेत. बँकेच्या विशेष योजनेंतर्गत हे व्याजदर दिले जात आहेत.

६. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक २ आणि ३ वर्षांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९ टक्क्यांचं व्याज देत आहे. हे व्याजदर ७ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेत. १५ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ९ टक्के व्याज देण्यात येतंय. अशाप्रकारे २ ते ३ वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ९.१० टक्के व्याज मिळतंय.

७. युनिटी स्मॉल फायनान्स बँक विशेष एफडीसाठी ९.२५ टक्के आणि ९.५० टक्क्यांचं व्याज देत आहे. ११ ऑगस्टपासून हे व्याजदर लागू करण्यात आलेत. ६ महिन्यांपासून २०१ दिवसांपर्यंतच्या एफडीवर ९.२५ टक्के, ५०१ दिवसांच्या एफडीवर ९.२५ टक्के आणि १००१ टक्क्यांच्या एफडीवर ९.५० टक्के व्याज मिळत आहे.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: These small finance banks in the country are offering more than 9 percent interest to senior citizens see the list fixed deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.