आजकाल भविष्याच्या दृष्टीनं बचत करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. लोक गुंतवणूकीसाठी अनेक पर्यायांचा शोध घेत असतात. दरम्यान, शेअर बाजारात पैसा गुंतवणाऱ्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळू शकतो, पण पैसे गमावण्याची भीतीही असते. अशा तऱ्हेनं बहुतांश लोक आपले पैसे गुंतवण्यासाठी बँकेत आपल्या पैशाची एफडी करतात. एफडीमध्ये कोणताही धोका नसतो. एकत्र मिळणारा परतावाही ठरलेला असतो. आज आम्ही तुम्हाला एफडीबद्दल अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा कमावू शकता.
पत्नीच्या नावावर एफडीचे फायदे
नियमांनुसार, जर तुम्हाला तुमच्या एफडीवर वर्षभरात ४०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर तुम्हाला १० टक्के टीडीएस भरावा लागतो. पण जर तुमची पत्नी गृहिणी असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी घेऊन टीडीएस टाळू शकता.
कोणाला टीडीएसमधून सूट?
ज्यांचं एकूण करपात्र उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या लोकांना टीडीएस भरावा लागत नाही. जर बँक तुम्हाला एफडी व्याज म्हणून पैसे देत असेल तर ते पैसेही तुमच्या उत्पन्नात गणले जातात. त्यामुळे तुम्हाला एफडीच्या व्याजाच्या पैशांवर टीडीएसही भरावा लागतो.
याशिवाय तुम्हाला एफडीच्या व्याजावरील कर टाळायचा असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट अकाऊंटही उघडू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीला फर्स्ट होल्डर बनवावं लागेल.