नवी दिल्ली : व्यापारी आणि जवाहिऱ्यांकडून असलेली कमी मागणी आणि परदेशातही तीच परिस्थिती यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव कोसळले. सोने १0 ग्रॅममागे २३५ रुपयांनी घसरून २६,५७५ रुपये, तर चांदी किलोमागे ९00 रुपयांनी घसरून ३४,७00 रुपये झाली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मागील आठवड्यात व्याजदर वाढविले नाहीत. पण यंदा कधीतरी व्याजदरात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे परदेशात सोन्याला कमी मागणी आली. जागतिक स्तरावर सोन्याचे भाव 0.६ टक्क्यांनी घसरून १,१२५.७२ डॉलर प्रतिऔंस झाले.चांदीचे दरही 0.५ टक्क्यांनी घसरून १४.५२ अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. सोमवारी चांदीचे दर ३.४ टक्क्यांनी घसरले होते. जवाहिऱ्याकडून झालेल्या कमी मागणीबरोबरच सध्या पक्षपंधरवडा सुरू झाल्यानेही सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे बाजार सूत्रांनी सांगितले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ सोने २३५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,५७५ आणि २६,४२५ प्रति दहा ग्रॅम झाले. गेल्या दोन दिवसांत सोने ४४0 रुपयांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचीही ९00 रुपयांनी मोठी घसरण होत किलोचा दर ३५ हजाराच्या खाली येत ३४,८३0 रुपये झाला. चांदीच्या नाण्याचे दरही याच प्रमाणात घसरले. चांदीच्या १00 नाण्यांच्या विक्रीचा भाव ५१ हजार रुपये, तर खरेदीचा दर ५0 हजार रुपये झाला.
सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी कोसळले
व्यापारी आणि जवाहिऱ्यांकडून असलेली कमी मागणी आणि परदेशातही तीच परिस्थिती यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव कोसळले
By admin | Published: September 29, 2015 10:53 PM2015-09-29T22:53:47+5:302015-09-29T22:53:47+5:30