Join us

म्युच्युअल फंडांच्या निधीमध्ये तिसऱ्यांदा घट

By admin | Published: February 06, 2016 2:59 AM

म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या मालमत्तेमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घट नोंदविली गेली.

नवी दिल्ली : म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या मालमत्तेमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घट नोंदविली गेली. इक्विटी योजनांमध्ये कमी गुंतवणूक झाल्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत या उद्योगाची अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट कमी होऊन १२.७४ लाख कोटी झाली.असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंडस् इन इंडियाने (एंफी) दिलेल्या ताज्या आाकडेवारीनुसार जानेवारीअखेर देशात ४० म्युच्युअल फंड कंपन्यांचा एयूएम १२,७३,७१४ कोटी रुपये झाला. तो गेल्या वर्षी याच कालावधीत १२,७४,८३५ कोटी रुपये होता. नोव्हेंबर महिन्यात या उद्योगाचा एयूएम १२.९५ लाख कोटी रुपये होता. आॅक्टोबरमध्ये सर्वात जास्त १३.२४ लाख कोटी रुपये होता. एंफीने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१५ मध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांचा एयूएम ११.८७ लाख कोटी रुपये होता. गेल्या महिन्याच्या शेवटपर्यंत म्युच्युअल फंड योजनांचा एकूण गुंतवणूक प्रवाह २२,५६९ कोटी रुपये होता.