Join us

तांदूळ महोत्सवात दीड कोटीची उलाढाल

By admin | Published: May 09, 2016 3:02 AM

तांदूळ महोत्सवात रविवारी दुसऱ्या दिवशीपर्यंत १४५० क्विं टल तांदळाची विक्री झाली. विविध वाणाच्या तांदळाबरोबरच गूळ, काकवी, खोबरे खरेदीसाठीही ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती

कोल्हापूर : तांदूळ महोत्सवात रविवारी दुसऱ्या दिवशीपर्यंत १४५० क्विं टल तांदळाची विक्री झाली. विविध वाणाच्या तांदळाबरोबरच गूळ, काकवी, खोबरे खरेदीसाठीही ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांत येथे तब्बल दीड कोटींची उलाढाल झाली.कृषि विभागाच्यावतीने शनिवारपासून कसबा बावडा येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच शहराबाहेर महोत्सवाचे आयोजन केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळेल, याबाबत संयोजकांना साशंकता होती; पण शहरापेक्षा येथे अधिक प्रतिसाद मिळत आहे. तांदळाबरोबर नागली, गूळ, काकवी, खोबरे, खोबरे पावडर, हळद याचीही विक्री येथे सुरू आहे. रविवारपर्यंत तांदळाच्या विविध वाणांची १४५० क्विंटलची विक्री झालेली आहे. (प्रतिनिधी)