Join us  

700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 3:16 PM

लघु वित्त बँका व्यावसायिक बँकांच्या तुलनेत एफडीवर जास्त व्याजदर देतात.

मुंबई : आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी एफडीवरील (FD) व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूनक करण्यासाठी लोकांचे आकर्षण वाढू लागले आहे. मोठ्या संख्येने तरुणही आता एफडीमध्ये पैसे गुंतवू लागले आहेत. अनेक बँका एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

लघु वित्त बँका व्यावसायिक बँकांच्या तुलनेत एफडीवर जास्त व्याजदर देतात. विशेष म्हणजे येथे गुंतवणुकीचा धोका खूपच कमी आहे. तर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात परताव्याची खात्री नसते. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशाच काही स्मॉल फायनान्स बँकांच्या एफडी दरांबद्दल सांगणार आहोत.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank FD Rates)युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी एफडीवर 4.5 ते 9 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांच्या एफडीवर 9.5 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. किरकोळ ग्राहकांना या कालावधीसाठी 9 टक्के व्याज मिळू शकते. हे व्याजदर 2 मे 2023 पासून लागू आहेत.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांसाठी एफडीवरील व्याज दर6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 201 दिवसांपर्यंत - 8.75 टक्के 501 दिवस - 8.75 टक्के 1001 दिवस - 9.00 टक्के 

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याज दर6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 201 दिवसांपर्यंत - 9.25 टक्के501 दिवस -  9.25 टक्के1001 दिवस -9.50 टक्के

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक  (Utkarsh Small Finance Bank FD rates)उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत तुम्हाला 700 दिवसांच्या एफडीवर 8.25 टक्के व्याजदर मिळू शकतात. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी 9 टक्के व्याजदर मिळू शकतो. नवीन एफडी दर 27 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.75 ते 9 टक्के व्याजदर देत आहे.

फिनसर्व्ह स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank FD rates)फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आता एफडीवर 3 टक्के ते 8.4 टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 3.60 टक्के ते 9.01 टक्क्यांपर्यंत आहे. बँक 1000 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 9.01 टक्के व्याज देत आहे. हे दर 24 मार्चपासून लागू आहेत. 

टॅग्स :बँकव्यवसाय