Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:27 AM2023-07-17T06:27:51+5:302023-07-17T06:28:09+5:30

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे.

This Chinese company will manufacture EVs in India | ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  टेस्ला नव्हे तर ‘बीवायडी’ ही चीनमधील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. कंपनीने भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनी सुमारे ८ हजार २०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे. कंपनीच्या सहयाेगाने इलेक्ट्रिक कार व बॅटरी उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. कंपनी तेलंगणामध्ये कारखाना उभारणार आहे. यासाठी १५० एकर जमीन यापूर्वीच संपादित  केलेली आहे.  ‘बीवायडी’चा प्रकल्प मंजूर झाल्यास आणखी जमिनीची मागणी करण्यात येईल.

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार

या गाड्या आणणार
‘बीवायडी’ हॅचबॅकपासून लक्झरी कारची संपूर्ण श्रेणी भारतात लाॅंच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत काेणतीही टिप्पणी केलेली नाही. 

Web Title: This Chinese company will manufacture EVs in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.